loader
Breaking News
Breaking News
Foto

कारागृहातून स्वावलंबनाकडे : मुकुल माधव फाउंडेशनच्या पुढाकारातून रत्नागिरी कारागृहात प्लंबिंग प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ

रत्नागिरी : कारागृह हे केवळ शिक्षा भोगण्याचे ठिकाण नसून व्यक्तीच्या आयुष्यातील नव्या सुरुवातीचे केंद्र असावे, या विश्वासातून फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सामाजिक दायित्व (CSR) उपक्रमांतर्गत कार्यरत मुकुल माधव फाउंडेशन (MMF) गेली अनेक वर्षे देशातील विविध कारागृहांमध्ये पुनर्वसनात्मक उपक्रम राबवत आहे. शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास आणि मानवी सन्मान या माध्यमातून कैद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने पुनर्स्थापित करण्यासाठी फाउंडेशन सातत्याने कार्यरत आहे. दिनांक १५ जून २०२६ रोजी, रत्नागिरी जिल्हा कारागृहात कैद्यांसाठी ८० दिवसीय प्लंबिंग कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. हा उपक्रम मुकुल माधव फाउंडेशन, फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड, रत्नागिरी कारागृह प्रशासन आणि जन शिक्षण संस्थान, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत कैद्यांना प्लंबिंग क्षेत्रातील व्यावहारिक व तांत्रिक ज्ञान दिले जाणार असून, प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या सहभागी कैद्यांना स्किल इंडिया प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. या कौशल्याच्या माध्यमातून कारागृहातून मुक्त झाल्यानंतर त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुकुल माधव फाउंडेशनच्या संस्थापक सौ. रितू छाब्रिया यांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशनने यापूर्वीही पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृह, सातारा जिल्हा कारागृह तसेच राजस्थान आणि गुजरातमधील विविध कारागृहांमध्ये शिक्षण, कौशल्य विकास, आरोग्य, स्वच्छता आणि पायाभूत सुविधा विकासाचे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. कारागृहांना केवळ बंदिस्त जागा न मानता पुनर्वसन आणि सकारात्मक परिवर्तनाची केंद्रे बनविण्याचा फाउंडेशनचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी श्रीदत्त अलबुर (President – Operations), नंदकिशोर शिंपी (Plant HR Head), सागर चिवटे, आशिष आठवले, शामराव निंबाळकर आणि वरद गोरे यांनी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड व मुकुल माधव फाउंडेशनचे प्रतिनिधित्व केले. तसेच रत्नागिरी जिल्हा कारागृहाचे जेलर सचिन पाटील, जन शिक्षण संस्थानच्या निधी सावंत, अमृता शेट्ये आणि सान्वी कदम, प्रशिक्षण प्रशिक्षक भिकाजी नाटेकर तसेच कारागृहातील पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

यावेळी उपस्थित मान्यवरांनी कौशल्य विकासाद्वारे कैद्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या गरजेवर भर दिला. समाजाच्या मुख्य प्रवाहात पुनर्स्थापित होण्यासाठी आवश्यक कौशल्ये, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची भावना विकसित करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्यामार्फत राबविण्यात येणारा हा उपक्रम कैद्यांच्या पुनर्वसनासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने उचललेला प्रेरणादायी उपक्रम म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. ”शिक्षा ही शेवट नसून नव्या आयुष्याची सुरुवात आहे; आणि कौशल्य विकास हे त्या नव्या प्रवासाचे सक्षम साधन आहे,” असे मुकुल माधव फाउंडेशनच्या संस्थापक तथा फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक सौ. रितू छाब्रिया यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg