loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूलमध्ये फ्लाईंग ऑफिसर निसर्ग सुर्वे यांचे अकरावीच्या विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन

खेड (प्रतिनिधी) - रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलचा माजी विद्यार्थी फ्लाईंग ऑफीसर निसर्ग सुर्वे यांनी इयत्ता अकरावीच्या विद्यार्थांना NDA परीक्षेविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. प्रथमतः रोटरी स्कूलचा माजी विद्यार्थी फ्लाईंग ऑफीसर निसर्ग सुर्वे याचे संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे यांच्या हस्ते भेटवस्तू, पुस्तक व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. तद्नंतर शाळेतील शिक्षिका समुपदेशक भक्ती करंबळेकर यांनी फ्लाईंग ऑफीसर निसर्ग सुर्वे याच्या प्रगतीचा आढावा सांगितला. निसर्ग सुर्वेे याने इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी पर्यंतचे शिक्षण रोटरी स्कूलमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करून इयत्ता दहावी व बारावीमध्ये उत्तम यश प्राप्त केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रोटरी स्कूलमध्ये शिक्षण घेत असतानाच त्याची एन. डी. ए. प्रवेश परीक्षेची तयारी सुरू झाली होती. यासाठी त्याला रोटरी स्कूलमधील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते. निसर्ग याने जेएनयू मधून व्दितीय क्रमांक पटकावून बी. टेक पूर्ण केले. दि. 14 डिसेंबर 2024 रोजी हैदराबाद येथील हवाई दल ॲकॅडमीमधून फ्लाईंग ऑफीसर म्हणून नियुक्त झाला. फ्लाईंग ऑफीसर निसर्ग सुर्वे याने आपले मनोगत व्यक्त करताना NDA प्रवेश परीक्षेची तयारी कशी करायची याबद्दल मार्गदर्शन केले. तुम्ही मोठ्या पगाराची कुठलीही नोकरी करू शकता पण संरक्षण दलातील नोकरी ही फक्त नोकरी नसून ती एक जीवनशैली आहे. त्यात अनेक त्याग करावे लागतात व त्यातून तुम्हाला जे समाधान मिळते त्यांची तुलना कशाचीही होऊ होऊ शकत नाही. तसेच याबद्दल प्रशिक्षणाच्या काळातील जीवन कसे होते हे सांगितले. तसेच, विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले.

टाईम्स स्पेशल

सदरच्या कार्यशाळेप्रसंगी रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, उच्च माध्यमिक विभागप्रमुख राहुल गाडबैल, माध्यमिक विभागप्रमुख शैलेश देवळेकर व देवयानी महाजन, प्राथमिक विभागप्रमुख तेजश्री कानडे, पूर्वप्राथमिक विभागप्रमुख प्रितम वडके सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील समुपदेशक भक्ती करंबेळकर व आभार प्रदर्शन विलास गावडे यांनी केले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मार्गदर्शनपर शिबीरास शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg