loader
Breaking News
Breaking News
Foto

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: कोकणात मान्सूनसाठी पोषक वातावरणः २४ तासात पाऊस कोसळणार !

मुंबई:कोकणातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी येत आहे येत्या 24 तासात कोकणात पावसाला सुरुवात होणार आहे. हवामान तज्ञांनी दिलेल्या अंदाजानुसार अरबी समुद्रामध्ये मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.मुंबईत मान्सून पोहोचण्याची सरासरी तारीख ११ जून असली, तरी या वर्षी 'एल-निनो'च्या प्रभावामुळे मान्सून रेंगाळला आहे. यापूर्वी २०१९ आणि २०२३ या एल-निनोच्या वर्षांतही मुंबईत तब्बल १४ दिवस उशिराने, म्हणजेच २५ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. चालू वर्ष २०२६ मध्येही एल-निनोचा प्रभाव असल्याने, यंदाही नेमकी तीच तारीख म्हणजे २५ जून रोजीच मुंबईत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. २५ जून ते १ जुलै या कालावधीत मुंबई आणि संपूर्ण कोकण पट्ट्यात मान्सूनचा जोरदार प्रहार पाहायला मिळू शकतो. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या दिवसाच्या दमट हवेपासून आणि रात्रीच्या असह्य उकाड्यापासून आज (२० जून) शनिवारपासूनच हळूहळू दिलासा मिळण्यास सुरुवात होईल, कारण वातावरणात बदल होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. वेंगुर्ला, देवगड आणि हर्णे भागात सध्या पूर्वमोसमी सरी कोसळत असून, लवकरच कोंकणात मुख्य मान्सूनच्या पावसाला गती मिळणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबईत मान्सून पोहोचण्याची सरासरी तारीख ११ जून असली, तरी या वर्षी 'एल-निनो'च्या प्रभावामुळे मान्सून रेंगाळला आहे. यापूर्वी २०१९ आणि २०२३ या एल-निनोच्या वर्षांतही मुंबईत तब्बल १४ दिवस उशिराने, म्हणजेच २५ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. चालू वर्ष २०२६ मध्येही एल-निनोचा प्रभाव असल्याने, यंदाही नेमकी तीच तारीख म्हणजे २५ जून रोजीच मुंबईत मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. २५ जून ते १ जुलै या कालावधीत मुंबई आणि संपूर्ण कोकण पट्ट्यात मान्सूनचा जोरदार प्रहार पाहायला मिळू शकतो. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या दिवसाच्या दमट हवेपासून आणि रात्रीच्या असह्य उकाड्यापासून आज (२० जून) शनिवारपासूनच हळूहळू दिलासा मिळण्यास सुरुवात होईल, कारण वातावरणात बदल होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. वेंगुर्ला, देवगड आणि हर्णे या भागात सध्या पूर्वमोसमी सरी कोसळत असून, लवकरच तिथे मुख्य मान्सूनच्या पावसाला गती मिळणार आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg