loader
Breaking News
Breaking News
Foto

बहुजन समाज पार्टीच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी सुधाकर माणगांवकर

मालवण (प्रतिनिधी) - बहुजन समाज पार्टीची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली असून, जिल्हाध्यक्षपदी सुधाकर माणगावकर यांची निवड करण्यात आली आहे. काल बसपाचे रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ प्रभारी अनिकेत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत नवीन जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना लोकसभा प्रभारी अनिकेत पवार म्हणाले की, गत ७ जून रोजी झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करायची आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे 'बहुजन समाज पार्टी' हे देशातील एकमेव संघटन आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यकर्त्यांनी मान्यवर कांशीरामजींचा त्याग, समर्पण आणि राष्ट्रीय अध्यक्षा बहेन मायावतीजींचे खंबीर नेतृत्व पाठीशी ठेवून प्रामाणिकपणे काम केले तर निश्चितच यशस्वी होऊ. उर्वरित कार्यकारिणी अशी- उपाध्यक्ष पी. के. चौकेकर, महासचिव दीपक जाधव, कोषाध्यक्ष बाळासाहेब ख्यामनकेरी, जिल्हा सचिव दुलाजी चौकेकर, जिल्हा सदस्य आनंद सम्राट, मारुती सोनवडेकर, बामसेफ जिल्हा संयोजक आनंदकुमार धामापूरकर यांचा समावेश आहे. नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुधाकर माणगावकर यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानत, जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांची कार्यकारिणी लवकरात लवकर नियुक्त करण्याचा संकल्प सोडला. तसेच कार्यकर्त्यांनी आपले तन, मन आणि धन या सामाजिक चळवळीसाठी समर्पित करावे, असे आवाहन त्यांनी केले.

टाईम्स स्पेशल

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष पी. के. चौकेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, बसपा ही केवळ एक राजकीय पार्टी नसून, विषमतावादी व्यवस्था नष्ट करून समतावादी महापुरुषांच्या विचारांची चळवळ आहे. आम्ही सर्व कार्यकर्ते या चळवळीचे पाईक म्हणून प्रामाणिकपणे काम करू. या बैठकीचे स्वागत व प्रास्ताविक जिल्हा महासचिव दीपक जाधव यांनी केले. एस. जी. विणकर यांनी आभार मानले. या बैठकीला जिल्ह्यातील बसपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg