loader
Breaking News
Breaking News
Foto

शासकीय जागा कुणालाही फुकट देऊ नका; उत्पन्न वाढवणे हेच आपले काम, आमदार निलेश राणे यांचा नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांना सल्ला

सावंतवाडी (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे आणि मी स्वतः तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. शासनाची किंवा पालिकेची जागा कुणालाही फुकट देऊ नका. तुम्ही जो कायदेशीर दर ठरवला आहे, तो आम्हाला पूर्णपणे मान्य आहे. उलट, महाराष्ट्रात जमिनीला सर्वात जास्त दर सावंतवाडीत मिळतोय, अशीच चर्चा संपूर्ण राज्यात होऊ द्या. पालिकेचे उत्पन्न वाढवले यात वाईट काय?" अशा शब्दांत शिवसेना आमदार निलेश राणे यांनी सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्या भूमिकेचे जाहीर कौतुक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते म्हणाले, जिल्ह्यात आमच्या वेगवेगळ्या संस्था कार्यरत आहेत. मात्र, आम्ही कधीही शासनाकडे कोणतीही जागा फुकट द्या किंवा कमी दराने द्या, अशी मागणी केली नाही. परंतु, काहीजण आज समाजात छाती ठोकून सांगतात की 'मला जागा फुकट दिली नाही'. अशा प्रवृत्तींना जागा दाखवून देणे गरजेचे आहे. ​जागा मोफत देण्याच्या मागणीवर तीव्र आक्षेप घेत आमदार राणे म्हणाले की, शासनाची मौल्यवान जागा आपण कशासाठी फुकट देणार? आज एकाला दिली तर उद्या सगळेच उठतील आणि 'आम्ही रोजगार देतो, आम्हाला जागा फुकट द्या' अशी मागणी करतील.

टाईम्स स्पेशल

प्रशासकीय कामकाजात असे चालत नाही, सर्व कामे ही प्रशासनाच्या नियमानुसारच होणार. जागा मागणारे संबंधित लोक उद्या त्यांच्या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातील काही वाटा नगरपरिषदेला देणार आहेत का? जर ते पालिकेला आपल्या उत्पन्नातून हिस्सा देणार असतील, तर नक्कीच विचार करता येईल. मात्र, तसे नसेल तर कोणतीही जागा फुकट दिली जाऊ नये, असा सल्ला त्यांनी दिला. नगरपरिषदेचे आर्थिक हित आणि उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आहे, असे सांगत निलेश राणे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. जिल्ह्याचे आणि पालिकेचे उत्पन्न वाढवणे हेच लोकप्रतिनिधी म्हणून आपले प्रमुख काम आहे आणि या कामात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी या निमित्ताने दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg