loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगडमध्ये वाहतुकीस अडथळा, दोन चारचाकी चालकांवर गुन्हे दाखल

खेड (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथे सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे मंडणगड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. पहिली घटना २४ जून २०२६ रोजी सायंकाळी ४.४० वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालयासमोरील आठवडा बाजार परिसरात घडली. याप्रकरणी सलीम कासीम सावंत (वय ६१, रा. कोणार एलिगेन्स, प्लॉट क्र. बी-२५, वडगाव शेरी, पुणे) यांनी त्यांच्या ताब्यातील चारचाकी मंडणगड-मुंबई मार्गावरील सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक पद्धतीने उभी करून वाहने व पादचार्‍यांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पोलीस कर्मचारी विशाल विठोबा कोळथरकर यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८५ अन्वये गुन्हा क्रमांक ७२/२०२६ दाखल करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्याच ठिकाणी आणखी एका वाहनचालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली. वैभव संतोष पोस्टुरे (वय ३२, रा. तुळशी, ता. मंडणगड) यांनी चारचाकी सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा स्थितीत उभी केल्याचे आढळून आले. याप्रकरणीही पोलीस कर्मचारी विशाल विठोबा कोळथरकर यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८५ अंतर्गत गुन्हा क्रमांक ७३/२०२६ दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास मंडणगड पोलीस करीत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg