मान्सूनमुळे कोकण प्रदेश निसर्गसौंदर्याने नटून जातो, परंतु त्याचबरोबर मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे रेल्वे संचालनासमोर मोठी आव्हानेही उभी राहतात. प्रवाशांची सुरक्षा आणि अखंड रेल्वे सेवा या सर्वोच्च प्राधान्यांना लक्षात घेऊन कोकण रेल्वेने आपल्या संपूर्ण मार्गावर व्यापक मान्सूनपूर्व तयारी केली आहे. सक्रिय आणि दूरदृष्टीपूर्ण दृष्टिकोनाचा भाग म्हणून, कोकण रेल्वेने पायाभूत सुविधांचे बळकटीकरण, भू-सुरक्षा उपाययोजना, रिअल-टाइम निरीक्षण प्रणाली, वाढीव गस्त आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा यांचा समावेश असलेली सर्वसमावेशक मान्सून तयारी योजना राबविली आहे. भू-सुरक्षा आणि निरीक्षण तंत्रज्ञानातील सातत्यपूर्ण प्रगतीमुळे कोकण रेल्वे मान्सून हंगामातील आव्हानांना तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.
१५ जून ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत मान्सून वेळापत्रक लागू राहील. सुरक्षित आणि विश्वासार्ह रेल्वे वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी मार्गावरील विविध विभागांमध्ये वेगमर्यादा लागू करण्यात येतील. मान्सून काळात बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथे २४ु७ नियंत्रण कक्ष कार्यरत असतील. सर्व ७२ स्थानकांवरील सीसीटीव्ही प्रणालींचे निरीक्षण स्टेशन मास्टर कार्यालये आणि मार्गावरील ९ आरपीएफ चौक्यांमधून केले जाते. कोकण रेल्वे भारतीय हवामान विभाग यांच्याशी समन्वय साधून दररोज हवामानाचा आढावा घेते आणि हवामान अंदाजानुसार संबंधित अधिकार्यांना डचड सूचना पाठवते. चिपळूण, रत्नागिरी, वेर्णा, मडगाव, कारवार आणि उडुपी येथे वैद्यकीय पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. कोकण रेल्वेच्या सर्व गाड्यांच्या पॅन्ट्री कारमध्ये अत्यावश्यक औषधांनी युक्त प्रथमोपचार पेट्या उपलब्ध आहेत.
प्रवासी या संकेतस्थळावर किंवा १३९ या हेल्पलाईन क्रमांकावर रेल्वेची अद्ययावत माहिती मिळवू शकतात. कोकण रेल्वे सुरक्षितता, विश्वासार्ह सेवा आणि प्रवासी सुविधा यांसाठी कटिबद्ध आहे. व्यापक तयारी आणि सतत देखरेखीच्या माध्यमातून कोकण रेल्वे संपूर्ण मान्सून हंगामात सुरक्षित आणि सुरळीत रेल्वे सेवा सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे.











































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.