loader
Breaking News
Breaking News
Foto

साखरपा आरोग्य केंद्रात अनेक तक्रारी झालेल्या डॉक्टरांना देवळे प्रा. आ. केंद्रात आणू, नये जनतेची मागणी

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील देवळे प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या महिला डॉक्टरबाबत सहकारी कर्मचारी व जनतेतून तक्रारी होत असून त्यांची येथून बदली करावी, अशी मागणी आरोग्य सभापती विलास चाळके यांच्या देवळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे झालेल्या सभेमध्ये करण्यात आली. मात्र ही बदली करताना साखरपा आरोग्य केंद्रात अनेक तक्रारी असलेल्या महिला डॉक्टर देवळे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणू नये, अशी मागणी देवळे परिसरातील जनतेने केली आहे. देवळे प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेले महिला डॉक्टर वेळेत उपलब्ध होत नसल्याची रुग्णांची तक्रार असून त्यांची इतरत्र बदली करावी, अशी मागणी या सभेत करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र त्यांची बदली करताना अशाच प्रकारच्या अनेक तक्रारी असलेल्या साखरपा आरोग्य केंद्रातील महिला डॉक्टरना त्या जागी आणण्याचा घाट घालण्यात आला असल्याची चर्चा सध्या देवळे पंचक्रोशी मध्ये सुरू आहे. साखरपा आरोग्य केंद्रातील महिला डॉक्टर यांच्यावर अनेक कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते व महिला वर्गाने अनेक तक्रारी केल्या आहेत. नुकत्याच झालेल्या आरोग्य सभापती विलास चाळके यांच्या सभेमध्ये सुमारे दोन ते अडीच तास या महिला डॉक्टर यांच्याच विषयावर चर्चा झाली होती. अशा तक्रार असलेल्या डॉक्टरांना पुन्हा देवळे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्याचा जर घाट घालण्यात येत असेल तर असलेले डॉक्टर बरे म्हणण्याची वेळ जनतेवर येईल असेच या परिसरात बोलले जात आहे.

टाईम्स स्पेशल

साखरपा आरोग्य केंद्रातील डॉक्टरांवर योग्य प्रकारे रुग्णांची तपासणी केली जात नसल्याच्या व शासकीय लॅब असताना बाहेरून रक्त तपासणी करून आणण्यासाठी सांगितले जात होते. तसेच वेळेवर प्रा.आ. केंद्रात हजर राहत नसल्याची तक्रारी असताना त्यांना देवळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे का आणण्याचा घाट घातला जात आहे हेच कळत नसल्याचे या परिसरातील जनता म्हणत आहे. या दोन्ही महिला डॉक्टर वेळेवर उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी होत आहेत. साखरपा आरोग्य केंद्रात याच विषयावर दोन ते अडीच तास चर्चा झाली असताना त्यांना पुन्हा देवळे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणूच नये, अशी मागणी देवळे परिसरातून होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg