loader
Breaking News
Breaking News
Foto

शाळेच्या पहिल्याच दिवशी साटेली-भेडशीत विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली

साटेली-भेडशी (प्रतिनिधी) : राज्यातील प्राथमिक शाळा आजपासून सुरू झाल्या असून शाळेच्या पहिल्याच दिवशी प्राथमिक जिल्हा परिषद साटेली केंद्र शाळेच्यावतीने विद्यार्थ्यांची साटेली-भेडशी बाजारपेठेत भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. शिक्षणाबाबत जनजागृती व्हावी तसेच मुलांना शाळेची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बेंजोच्या गजरात आणि उत्साहपूर्ण वातावरणात काढण्यात आलेल्या या रॅलीत विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगणारे संदेश देत बाजारपेठेतून फेरी काढली. शाळा सुरू झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, शाळेच्या पहिल्या दिवशी नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी आरती ओवाळून आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg