loader
Breaking News
Breaking News
Foto

आजी-माजी सैनिक कल्याण समिती, रत्नागिरी यांच्यावतीने २१ जून रोजी भव्य माजी सैनिक संपर्क व समस्या निवारण महामेळावा

वरवेली (गणेश किर्वे) - आजी-माजी सैनिक कल्याण समिती, रत्नागिरी यांच्यावतीने (जिल्हास्तरीय रत्न सैनिक संघटना) आयोजित रेकॉर्ड्स बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप खडकी (पुणे) आयोजित भव्य माजी सैनिक संपर्क व समस्या निवारण महामेळावा रविवार दि. २१ जून २०२६ रोजी सकाळी ९ वा. ते सायं. ५ वा. स्थळ : पाटीदार भवन, इरिगेशन कॉलनी, कापसाळ (चिपळूण) येथे आयोजित करण्यात आला आहे. रेकॉर्डस बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप, खडकी (पुणे) यांचे पुढाकाराने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, मुंबई या जिल्ह्यातील माजी सैनिक, वीरनारी, सैनिक विधवा व अवलंबितांच्या विविध अडचणी/समस्यांचे निराकरण करण्याच्या हेतूने अनेक रेकॉर्ड ऑफीसचे प्रतिनीधी, PCDA (Pension) ECHS, CSD विविध बँकांचे प्रतिनिधी यांचे उपस्थितीत एक दिवशीय महा सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी जिल्हा हा कोकणातील मध्यवर्ती जिल्हा असल्याने चिपळूणमध्ये हा ऐतिहासिक मेळावा होत आहे. या सुवर्ण संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात येते. मेळाव्यात खालील प्रमुख विषय हाताळले जातील. १) निवृत्ती वेतनाशी संबंधित बाबी, २) जवळच्या नातेवाईकांचे (Next of kin) दस्तऐवजीकरण, ३) स्पर्श संबंधित समस्या, ४) इसीएचएस् कार्ड संबंधित समस्या, ५) पेन्शन वितरण आणि बँकींग संबंधित बाबी, ६) आधारकार्ड संबंधित समस्या, ७) वैद्यकीय / दंत शिबिर तरी सर्व माजी सैनिक, वीर नारी, वीर माता-पिता, माजी सैनिक विधवा व अवलंबित यांनी सकाळी ९ वा. नोंदणी काऊंटरवर खालील कागदपत्रांसह हजर रहावे.

टाईम्स स्पेशल

१) पी.पी.ओ. २) शुध्दीपत्र पी.पी.ओ. ३) डिस्चार्ज बुक ४) बँक पासबुक ५) पॅन कार्ड ६) आधार कार्ड, ७) मोबाईल ८) माजी सैनिकाकडे उपल्बध असलेल्या तक्रारी संबंधित इतर पत्र व्यवहाराच्या प्रती. असे आजी-माजी सैनिक कल्याण समिती, रत्नागिरी (जिल्हास्तरीय रत्न सैनिक संघटना) तर्फे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी हवालदार विलास गमरे - कोषाध्यक्ष मो. ८२७५९१८०१९ सार्जंट प्रफुल्ल रेडीज उपाध्यक्ष मो. ९४२०१५१९०६ हवालदार गणेश सुर्वे - सचिव मो. ९८५०६७६९२२ नायब सुभेदार सुधीर भोसले अध्यक्ष मो. ८०१०५८२७२२ / ७४४३९३५४२५ येथे संपर्क साधावा.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg