loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर तालुका कुंभार समाज युवा आघाडीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुका कुंभार समाज युवा आघाडीच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा श्री संत शिरोमणी गोरा कुंभार सभागृह येथे मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजाचे अध्यक्ष अरविंद पालकर, संपर्कप्रमुख नाना पालकर, सचिव चंद्रकांत साळवी, खजिनदार मदन कुंभार, सहखजिनदार महेश जामसुतकर, वासुदेव साळवी, सुनील गुडेकर, हेमंत शिरकर, उमेश खैर, शैलेश खैर, युवा अध्यक्ष वीरेंद्र साळवी, सर्वेश गुहागरकर, दिगंबर पालकर, प्रल्हाद हरचीलकर, अशोक पालकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कठोर परिश्रम, सातत्य आणि जिद्दीच्या बळावर भविष्यात उच्च शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालकवर्ग व समाजबांधव उपस्थित होते. उपस्थितांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असून समाजातील शैक्षणिक वातावरण अधिक बळकट होत असल्याची भावना व्यक्त केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा युवा सचिव सुधीर जामसुतकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गुहागर तालुका कुंभार समाज युवा आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg