loader
Breaking News
Breaking News
Foto

हर्णे बाजारपेठेत वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांब रांगा

दापोली (प्रतिनिधी) : दापोली किनारपट्टी भागात रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटक आल्याने दापोली, हर्णे, पाजपंढरी, आंजर्ले मार्गावरील हर्णे बाजारपेठेत वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यामुळे काही काळ वाहनांना एकाच जागेवर थांबून राहावे लागले तर पादचार्‍यांनाही वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. दापोली तालुक्यातील किनारपट्टी भागात तसे नेहमीच पर्यटक हे पर्यटनासाठी येत असतात. त्यात शनिवार रविवार किंवा एखाद दुसरी जोडी सुट्टी आली कि हमखास करून पर्यटक निवांतपणासाठी दापोलीत येत असतात. तसे शनिवारी आणि रविवारी या जोडून आलेल्या सुट्टीमुळे पर्यटक दापोलीत आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यामुळे लाडघर, मुरुड, कर्दे, पाळंदे, हर्णे, आंजर्ले, केळशी येथील समुद्र किनारे हे पर्यटकांच्या गर्दीने गजबजले होते. दापोलीहून आंजर्लेकडे जाणारे पर्यटक हे हर्णे बाजारपेठेतून पुढे सुवर्णदुर्ग किल्ला, गोवा किल्ला, कणकदुर्ग, फत्तेगड आदी गड किल्ल्यांची सफर करत आंजर्लेकडे जात असतात. हर्णे बाजारपेठेतून जाणारा मार्ग हा तसा अरुंद आहे. त्यात बाजारपेठ असल्याने येथे मोठी गर्दी असते. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. तसे रविवारी या मार्गावर मोठ्या प्रमाणात पर्यटक आल्याने हर्णे बाजारपेठेत वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटेपर्यंत वाहनांना एकाच ठिकाणी कित्येक वेळ थांबून राहावे लागले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg