loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रभात हायस्कूल शिवतरमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांचा सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटप

खेड - शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्था मुंबई संचलित प्रभात हायस्कूल शिवतर खेड या प्रशालेत सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षी इ.५ वी ते १० वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्था मुंबई यांचे वतीने करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्रशालेत शिक्षण घेत असलेल्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना कदम फाऊंडेशन अपेडे व प्रशालेतील एस.एस.सी सन २०१२-१३ बॅचच्या माजी विद्यार्थीकडून प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदरचा कार्यक्रम संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम पालांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. सदर का‌र्यक्रमाला संस्थेचे सचिव सुनिल रामचंद्र मोरे, संस्था कार्याध्यक्ष सूर्यकांत मोरे, चेअरमन शशिकांत कदम, व्हाईस चेअरमन शिवाजी मोरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष काशीनाथ मोरे, उपाध्यक्ष राजेश सुर्वे, शाळा समिती सदस्य दिपक सुर्वे, मा.विद्यार्थी अक्षय सुर्वे, निशिकांत पाटणकर, इफ्तीकार पेडेकर, मा.व्हाईस चेअरमन शिवाजी पालांडे, कदम फाऊंडेशन अपेडे चे अध्यक्ष गणपत कदम, सचिव प्रकाश कदम, खजिनदार पंकज कदम व सर्व फाऊंडेशन चे पदाधिकारी तसेच शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष सुनील वारणकर, पालक, विद्यार्थी व सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दळवी यांनी केले. प्रशालेचे मुख्याध्यापक काझी यांनी प्रशालेत राबवित असलेले उपक्रमाविषयी माहिती दिली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg