संगलट (खेड) (इक्बाल जमादार) - निसर्गाच्या कुशीत उगवणार्या रानभाज्या म्हणजे पावसाळ्याचे एक वेगळेच वरदान. पावसाच्या पहिल्या सरींबरोबरच रानावनात डोकावणार्या या भाज्या केवळ चवदारच नाहीत, तर त्या औषधी गुणांनी परिपूर्ण असल्याने खवय्यांसाठी ही एक मोठी पर्वणीच असते. शेवळं, कुडा, आकुड, टाकळा यांसारख्या रानभाज्या पावसाळ्या-पूर्वीच रानात उगवू लागतात आणि पावसाळ्याच्या दिवसांत त्यांचा बहर अधिकच फुलतो. या भाज्यांच्या आगमनाची खवय्ये वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळे खवयांकडून मोठी मागणी आहे. गेल्या काही दिवसांपासून खेड तालुक्यातील ग्रामीण भागात व परिसरातील रानांमध्ये या भाज्यांना चांगला बहर आला असून जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये त्या मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी दाखल होऊ लागल्या आहेत.
पावसाळा जसजसा वाढत जाईल, तसतशा अधिकाधिक रानभाज्या उपलब्ध होतील, असे जाणकारांचे मत आहे. या भाज्या बाजारात आल्याबरोबर खवय्ये त्या आवर्जून विकत घेतात, एवढेच नव्हे तर रस्त्याने जाणारे प्रवासी आणि नागरिकही मुद्दाम थांबून या भाज्यांचीखरेदी करताना दिसतात. या रानभाज्या गोळा करण्याचे काम प्रामुख्याने आदिवासी महिलांकडून केले जाते. त्या रानावनात भटकून या भाज्या शोधतात आणि बाजारात आणून विकतात. यातून त्यांना चांगला रोजगार मिळत असून आर्थिक उत्पन्नाचे एक महत्त्वाचे हंगामी साधन उपलब्ध होते. सध्या या भाज्यांच्या एका जुडीची किंमत साधारणपणे वीस रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत आहे. आवक वाढेल तसतशी किंमत उतरत जाऊन प्रति जुडी दहा रुपयांपर्यंत येण्याची शक्यता आहे.
या रानभाज्या शिजवतानाही विशेष काळजी घ्यावी लागते. काही भाज्या आधी उकडून मग शिजवाव्या लागतात, तर काहींमध्ये विशिष्ट झाडांचा पाला मिसळावा लागतो. या पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक केल्यास भाज्या चवदार लागतातच, शिवाय त्या शरीरालाही बाधत नाहीत. पिढ्यानपिढ्या पासून चालत आलेले हे पाक कौशल्य आदिवासी समाजाच्या अनुभवाचे आणि निसर्ग ज्ञानाचे प्रतीक आहे. पौष्टिक गुणधर्म, औषधी मूल्य आणि अस्सल देशी चव यांमुळे या रानभाज्या केवळ एक खाद्यपदार्थ नसून त्या निसर्गाने माणसाला दिलेली एक अनमोल देणगी आहे.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.