मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र द्रुतगती प्रादेशिक योजना लवकरात लवकर अंमलात आणण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची एकत्रित बैठक आयोजित करावी, अशी आग्रही मागणी केसरकर यांनी केली. या मागणीला उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरात लवकर बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ च्या तरतुदीनुसार रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी १५ फेब्रुवारी १९८८ पासून प्रादेशिक योजना अंमलात आली आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाल्याने फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता २००४ साली पर्यटन विकास आराखडा मंजूर करण्यात आला.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग प्रादेशिक योजना तयार करण्यासाठी डिसेंबर २०२० पासून रत्नागिरी येथे नगर रचना सहाय्यक संचालक कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. तसेच ४ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र द्रुतगती प्रादेशिक योजना जाहीर झाली असून, याची कार्यवाही सिंधुदुर्ग शाखा कार्यालयाने करावयाची आहे. मात्र, अद्याप शासन स्तरावरून याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही सुरू झालेली नाही किंवा प्रादेशिक मंडळही स्थापन झालेले नाही. सध्या २००४ च्या पर्यटन आराखड्यानुसार विकास परवानग्या दिल्या जातात. मात्र, या आराखड्यात सुमारे ७५ टक्के क्षेत्र शेती, वने आणि इतर वनांमध्ये समाविष्ट आहे. सिंधुदर्गातील वाढत्या पर्यटनाला आणि विकासाला चालना देण्यासाठी सुधारित प्रादेशिक आराखडा तयार होणे अत्यंत आवश्यक आहे. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विकासात्मक कामे करताना पर्यटन प्लॅन, सीआरझेड, जलसंपदा नियंत्रण रेषा, नगरपंचायत हद्दीतील डीपी प्लॅन, वनक्षेत्र, कांदळवन क्षेत्र इत्यादींच्या परवानग्या आणि कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. विकास कामांना गती देण्यासाठी या सर्व परवानग्यांमध्ये सुलभता आणि एकसूत्रीपणा असणे आवश्यक आहे, असे केसरकर यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर आमदार दीपक केसरकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा करून सर्व विभागांची एकत्रित बैठक घेण्याची मागणी केली. या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित करण्याचेही त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्र्यांनी यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रसंगी आमदार केसरकर यांच्यासोबत सचिन वालावलकर उपस्थित होते.



















































.jpg)



























































































































































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.