सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दारू वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू आणि दोन वाहनांसह एकूण १० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीन आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिली कारवाई: तळवळे गडगेवाडी येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणकडून सापळा शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने तळवळे गडगेवाडी-तळी स्टॉप येथील मुख्य रस्त्यावर सापळा रचला होता. यावेळी संशयास्पद वाटणाऱ्या स्विफ्ट कारची (क्रमांक GA 05D 5576) झडती घेतली असता, त्यात २८ पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये गोवा बनावटीची विविध ब्रँडची दारू आढळून आली.
याप्रकरणी आरोपी मेल्व्हिन फर्नांडिस (रा. देवसा, उत्तर गोवा) आणि मनवेल फिलिप्स फर्नांडिस (रा. ख्रिश्चनवाडी, सातार्डा) यांच्यावर दारूबंदी व मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी १ लाख ७१ हजार २४० रुपयांची दारू आणि ५ लाख रुपये किमतीची कार, असा एकूण ६ लाख ७१ हजार २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक भोसले आणि हवालदार कांडर यांच्या पथकाने केली. दुसरी कारवाई: आंबोली फॉरेस्ट नाक्यावर टाटा सुमो पकडली. दुसऱ्या कारवाईत, म्हापसा-गोवा येथून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या टाटा सुमो गाडीची (क्रमांक MH 42 K 0269) आंबोली फॉरेस्ट नाका येथे तपासणी करण्यात आली. आंबोली दूरक्षेत्राच्या पोलीस पथकाने लावलेल्या सापळ्यात ही गाडी रंगेहात पकडली गेली. गाडीची झडती घेतली असता, त्यात बेकायदेशीररी्या वाहतूक केली जाणारी ४८ हजार ९६० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू (१२ बॉक्स) सापडली.
याप्रकरणी चालक आरोपी गोपीनाथ दगडू शितोळे (रा. गणेशवाडी, ता. दौंड, जि. पुणे) याच्यावर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दारू आणि ३ लाख रुपये किमतीची टाटा सुमो, असा एकूण ३ लाख ४८ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार मनीष शिंदे, लक्ष्मण काळे, रामदास जाधव, गौरव परब आणि सचिन चव्हाण यांच्या पथकाने केली.




















































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)








































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.