loader
Breaking News
Breaking News
Foto

निश्चय पोषण योजनेअंतर्गत रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलचा गौरव

खेड (प्रतिनिधी) - राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या निश्चय पोषण योजनेमध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल, खेडला तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, खेड यांच्या वतीने सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. क्षयरोगग्रस्त रुग्णांना पोषण सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी तसेच समाजात आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी शाळेने दिलेल्या मोलाच्या सहकार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याचबरोबर केंद्र शासनाच्या टीबी मुक्त भारत अभियान (100 Days Campaign) अंतर्गत रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलने विविध जनजागृतीपर उपक्रमांचे नियोजन करून विद्यार्थ्यांमध्ये क्षयरोगाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या अभियानामध्ये निबंध लेखन, पोस्टर निर्मिती, वक्तृत्व स्पर्धा, कला व सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थी जागरूकता सत्रे, निक्षय शपथ, सोशल मीडिया जनजागृती, निक्षय मित्र नोंदणी तसेच समुदाय संपर्क कार्यक्रम अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. शाळेतील शिक्षकांनी या सर्व उपक्रमांची जबाबदारी स्वीकारून विद्यार्थ्यांना क्षयरोग प्रतिबंध, लवकर निदान आणि उपचार याविषयी माहिती देण्याचे कार्य हाती घेतले आहे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करून ‘टीबीमुक्त भारत’ या राष्ट्रीय ध्येयासाठी योगदान देण्याचा संदेश या अभियानातून दिला जात आहे.

टाईम्स स्पेशल

तालुका आरोग्य अधिकारी यांनी शाळेच्या व्यवस्थापनाचे, मुख्याध्यापकांचे, शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत समाजहितासाठी केलेल्या या कार्याचे कौतुक केले. सामाजिक बांधिलकी जपत आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये सातत्याने सहभाग घेणाऱ्या रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या या कार्यामुळे क्षयरोग निर्मूलन मोहिमेला मोठे बळ मिळत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. हा सन्मान संपूर्ण रोटरी शालेय परिवारासाठी अभिमानाची बाब असून भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग सुरू ठेवण्याचा निर्धार शाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg