loader
Breaking News
Breaking News
Foto

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

रत्नागिरी : शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी रत्नागिरी नगर परिषद शाळा क्रमांक ६, नगर परिषद शाळा क्रमांक १२ तसेच नाईक हायस्कूल येथे विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले तसेच शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या गणवेशांचे वितरणही करण्यात आले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षक व मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास नगरसेविका सायली विकास पाटील तसेच नगरसेवक अभिजित सूर्यकांत दुडे हे प्रमुख उपस्थित होते. तसेच नगरसेविका सायली विकास पाटील यांनी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण घेण्याचे आवाहन करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg