loader
Breaking News
Breaking News
Foto

मुक्ताई ॲकेडमीतर्फे रविवार दि.२८ जुन रोजी विदयार्थ्यांसाठी कॅरम व बुदधिबळ प्रशिक्षण शिबीर

सावंतवाडी - सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीने पाच वर्षापासून पुढील मुलांसाठी व मुलींसाठी रविवार दि.२८ जुन रोजी एक दिवसाच्या कॅरम व बुदधिबळ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले आहे. सावंतवाडीतील खासकीलवाडा येथील पाटणकर वाड्यात मुक्ताई ॲकेडमीच्या प्रशिक्षण केंद्रात शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. कॅरम प्रशिक्षण शिबीर सकाळी ०९:३० ते दुपारी ०१:०० आणि बुदधिबळ प्रशिक्षण शिबीर दुपारी ०३:३० ते सायंकाळी ०६:३० या वेळेत घेण्यात येणार आहे. मर्यादित विदयार्थ्यांना शिबीरात प्रवेश दिला जाईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मागील दहा वर्षे मुक्ताई ॲकेडमी जिल्ह्यातील शालेय विदयार्थ्यांसाठी कॅरम व बुदधिबळ प्रशिक्षण शिबीरे, स्पर्धा, इत्यादी उपक्रम घेत आहे. ॲकेडमीचे अनेक विदयार्थी - विदयार्थिनी शालेय आणि असोसिएशनच्या राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पारितोषिक प्राप्त आहेत. मुक्ताई ॲकेडमीला राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर "बेस्ट ॲकेडमी" पुरस्कार मिळाले आहेत. शालेय आणि असोसिएशनच्या स्पर्धांमधुन मिळणारे गुण आणि मिळणारे फायदे या विषयी शिबीरात मार्गदर्शन केले जाईल.

टाईम्स स्पेशल

नाव नोंदणी आणि इतर माहितीसाठी कौस्तुभ पेडणेकर मोबाईल क्रमांक ८००७३८२७८३ याना संपर्क करायचा आहे. विदयार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी या शिबीरात सहभाग घेण्याचे आवाहन कौस्तुभ पेडणेकर यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg