loader
Breaking News
Breaking News
Foto

अंमली पदार्थांच्या विळख्यात तरुणाईला ओढणार्‍या रत्नागिरीतील दोघे सराईत ड्रग्ज तस्कर तडीपार, जिल्ह्यातील माफियांमध्ये प्रचंड खळबळ

रत्नागिरी: जिल्ह्यात अंमली पदार्थ (ड्रग्ज) विक्री आणि गुन्हेगारीविरोधात पोलिसांनी आता प्रचंड आक्रमक पाऊल उचलले आहे. रत्नागिरी शहरात ड्रग्जचे जाळे पसरवणार्‍या आणि तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यात ओढणार्‍या दोन सराईत ड्रग्ज तस्करांवर प्रशासनाने तडीपारीचा मोठा हातोडा मारला आहे. उपविभागीय दंडाधिकारी जीवन देसाई यांनी या दोघांना रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि कोल्हापूर अशा तब्बल चार जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार (तडीपार) करण्याचे आदेश दिले आहेत. या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील ड्रग्ज माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मोहम्मद ताहिर इब्राहिम मस्तान (रा. वरचा मोहल्ला, मिरकरवाडा, रत्नागिरी) आणि झहीर मेहमुद काझी (रा. गवळीवाडा, रत्नागिरी) अशी तडीपार करण्यात आलेल्या दोन कुख्यात गुन्हेगारांची नावे आहेत. या दोघांवरही अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (एनडीपीएस) गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या वाढत्या गुन्हेगारी कारवाया आणि समाजातील उपद्रव लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांनी या दोघांच्या तडीपारीचा सविस्तर प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकार्‍यांकडे सादर केला होता. या प्रस्तावाची गंभीर दखल घेत, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दंडाधिकारी जीवन देसाई यांनी दोघांनाही तात्काळ चार जिल्ह्यांच्या सीमा ओलांडण्याचे आदेश दिले.

टाईम्स स्पेशल

रत्नागिरी पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरोधात पुकारलेल्या या युद्धामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. शहरातील मिरकरवाडा आणि गवळीवाडा यांसारख्या संवेदनशील भागातून या गुंडांना हुसकावून लावल्यामुळे पोलिसांचे मनोधैर्य वाढले आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जिल्ह्यातील शांतता आणि तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणार्‍या कोणत्याही गुन्हेगाराची गय केली जाणार नाही. येत्या काळातही ही धडक मोहीम अशीच सुरू राहणार असून, गुन्हेगारांवर कडक पाळत ठेवली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg