loader
Breaking News
Breaking News
Foto

संगणकीय त्रुटी दुर करून आचऱ्यातील शेतकऱ्यांना फार्मर आय् डी द्या, आचरा इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थांन समितीची मागणी

मालवण (प्रतिनिधी) - महाराष्ट्रात शासनाने जाहीर केलेल्या बहुउदेशिय ॲग्रीस्टॅक फार्मर आय डी योजनेअंतर्गत नोंदणी करण्यास गेलेल्या आचरा येथील कुळवहीवाटदार शेतकऱ्यांना संगणक प्रणालीतील त्रुटीमुळे फार्मर आयडी नोदणी न करताच सेवा केंद्रावरून माघारी परतावे लागत आहे. आचरा गावातील असे हजारो शेतकरी बांधवांस केवळ संगणकीय त्रुटीमुळे शासनाच्या असंख्य कृषी योजनांच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे च्या पदाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांची भेट घेऊन सदर विषयी चर्चा करून संगणकीय त्रुटी दुरु करून आचऱ्यातील शेतकऱ्यांना फार्मर आय् डी द्यावा अशी मागणी देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी इनामदार रामेश्वर संस्थान कसबा आचरे अध्यक्ष प्रदीप प्रभूमिराशी, उपाध्यक्ष श्रेयांस कानविंदे, सचिव संतोष मिराशी, कोषाध्यक्ष कपिल गुरव, विश्वस्त संजय मिराशी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दिनांक 14 ऑक्टोबर, 2024 रोजीच्या शासन निर्णया अन्वये अँग्री स्टॅक योजनेला मान्यता देण्यात आली. ह्या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फार्मर आयडी नोंदणी करणे क्रमप्राप्त आहे.

टाईम्स स्पेशल

फार्मर आयडी नोंदणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकार प्रति योजनांचा लाभ मिळेल असेही त्यात नमूद आहे. अशा स्तुत्य योजनेत भाग घेण्याकरता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आचरे गावातील अनेक शेतकऱ्यांनी प्रयत्न करूनही त्यांचा फार्मर आयडी नोंद झाला नाही. सबब आचरे गावातील हजारो शेतकरी आज महाराष्ट्र सरकारच्या अनेक योजनांना मुकले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg