loader
Breaking News
Breaking News
Foto

नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धेत संगमेश्वरच्या विवान भांगेची बाजी; चॅम्पियनपदाचा बहुमान

मकरंद सुर्वे / संगमेश्वर : पुणे येथील बालेवाडी येथे १४ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेत संगमेश्वरच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. मास्टर एज्युकेशन अकॅडमीचा विद्यार्थी विवान भांगे याने उत्कृष्ट कामगिरी करत स्पर्धेतील ‘चॅम्पियन’ हा मानाचा किताब पटकावला. या स्पर्धेत महाराष्ट्रासह विविध राज्यांतील सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांना अवघ्या १० मिनिटांत २०० गणिते अचूक सोडविण्याचे आव्हान देण्यात आले होते. वेग, अचूकता आणि एकाग्रतेची कसोटी पाहणाऱ्या या स्पर्धेत संगमेश्वरच्या विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवत घवघवीत यश मिळवले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये विवान भांगे याने चॅम्पियनपद मिळविले, तर सिया कुचेकर आणि आराध्य पांचाळ यांनी प्रथम क्रमांक, ओम झगडे याने द्वितीय क्रमांक तसेच युगा फटकरे आणि सिद्धाई मोरे यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि योग्य मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे. त्यांना वीरा इन्स्टिट्यूटचे संचालक श्री. धनाजी भांगे आणि पुष्पा इन्स्टिट्यूटच्या संचालिका सौ. सविता भन्साळी यांचे मार्गदर्शन लाभले.

टाइम्स स्पेशल

स्पर्धेनंतर आयोजित करण्यात आलेल्या गौरव समारंभात मास्टर एज्युकेशन अकॅडमीचे संचालक श्री. शिवराज पाटील यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पदके व प्रमाणपत्रे प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, “ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील योग्य प्रशिक्षण आणि मेहनतीच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश मिळवू शकतात,” असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे संगमेश्वर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्यांचे आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

१० मिनिटांत २०० गणिते सोडवून विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय स्तरावर संगमेश्वरचा गौरव

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg