साटेली भेडशी (प्रतिनिधी) : घोटगे-परमे येथील तिलारी नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूंना येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले लोखंडी कठड्यांचे पाईप अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे या पुलावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पुलाचा वापर घोटगे व परमे गावातील नागरिक, वाहनधारक, दुचाकीस्वार तसेच शाळकरी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात करतात. विशेषतः पावसाळ्यात तिलारी नदी दुथडी भरून वाहत असते. अनेकवेळा नदीला महापूर येऊन संपूर्ण पूल पाण्याखाली जातो. अशा परिस्थितीत पुलावरील सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले लोखंडी पाईप चोरीला गेल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.
सध्या पुलाच्या दोन्ही बाजूंना कोणतेही मजबूत संरक्षण नसल्यामुळे रात्रीच्या वेळी किंवा पुराच्या काळात वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वार यांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसू शकतो. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन पुलावर मजबूत व सुसज्ज सुरक्षा कठडे उभारावेत, तसेच चोरीला गेलेल्या लोखंडी पाईप प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी घोटगे व परमे गावातील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.











































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.