loader
Breaking News
Breaking News
Foto

टच सामाजिक संस्थेमार्फत शैक्षणिक साहित्याचे वाटप; ‘विभा अरविंद ग्रंथालय’ व ‘आपलं चिपळूण’ यांच्यासहयोगाने उपक्रम

संगलट (खेड) (इक्बाल जमादार) - विभा अरविंद ग्रंथालय आणि आपलं चिपळूण या समाजाभिमुख संस्थांच्या सहयोगाने मुंबईस्थित टच सामाजिक संस्थेच्या यांच्या माध्यमातून मंगळवार, दि. २३ जून रोजी चिपळूण तालुक्यातील विविध शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत मुंढे तर्फे सावर्डे पूर्ण प्राथमिक शाळा क्र. १, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अडरे क्र. २ तसेच श्रमिक सहयोग संचलित प्रयोगभूमी, कोळकेवाडी येथील विद्यार्थ्यांना वह्या, शालेय साहित्य व अन्य आवश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. “शिक्षण हेच सामर्थ्य ही संकल्पना ग्रामीण तसेच कोळकेवाडीसारख्या अतिदुर्गम, आदिवासी व कातकरी भागांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. शिक्षणाचा प्रवाह मागास भागांपर्यंत पोहोचावा आणि येथील विद्यार्थी मुख्य प्रवाहात सहभागी व्हावेत, या उदात्त हेतूने संबंधित संस्था सातत्याने कार्यरत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विभा अरविंद ग्रंथालय हे केवळ वाचनालय नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक चळवळीचे प्रभावी केंद्र बनत असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले. या प्रसंगी टच संस्थेच्यावतीने दर्शिनी देसाई व जया कांबळी उपस्थित होत्या. तसेच ग्रंथालयाचे संचालक प्रा. विकास मेहंदळे, कार्यवाह विजय कदम, दत्त शिक्षण संस्थेचेचे अध्यक्ष तानाजीराव शिंदे, तसेच विभा अरविंद ग्रंथालयाचे कार्यकर्ते सुमित सागवेकर, स्मिता मेंदरकर, सिताराम पडते उपस्थित होते. या तिन्ही प्राथमिक शाळांमधील ६५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. मुंडे तर्फे सावर्डे शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी काजरोळकर, उपशिक्षक रमेश घडशी, सुनिल किजबिले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्राजक्ता मोरे, अंगणवाडी शिक्षिका प्रियंका मोरे उपस्थित होत्या.

टाईम्स स्पेशल

तसेच अडरे शाळा क्र. २ चे मुख्याध्यापक दादासाहेब चौगुले, समिती अध्यक्षा श्रावणी तांदळे, शिक्षणप्रेमी हरिश्चंद्र पिंपरे, अंगणवाडी सेविका स्वानंदी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. याशिवाय प्रयोगभूमी-कोळकेवाडी येथील मुख्याध्यापक मंगेश मोहिते, उपशिक्षिका रेखा मोहिते तसेच विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण व दुर्गम भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी प्रोत्साहन देत सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg