साटेली भेडशी (प्रतिनिधी) - संबोधी बहुउद्देशीय तालुका संस्था, दोडामार्ग यांच्या वतीने अनुसूचित जाती व बौद्ध समाजातील सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा "गुणगौरव सोहळा" रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन, बुद्धवंदना व पंचशील-त्रिशरणाने करण्यात आली. श्रामणेर अर्जुन कदम व श्रीधर जाधव यांनी पूजाविधी संपन्न केला. यावेळी विचारमंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आयु. शंकर मधुकर जाधव होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून संस्थेचे सल्लागार रमाकांत कृष्णा जाधव, उपाध्यक्ष बुद्धभूषण हेवाळकर, सहसचिव सदाशिव भिकाजी आयनोडकर, सल्लागार व्ही. ए. कदम तसेच सहसचिव ज्योती जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रमाकांत जाधव आणि बुद्धभूषण हेवाळकर यांनी विद्यार्थ्यांना दहावी-बारावीनंतरच्या शैक्षणिक संधी, स्पर्धात्मक युगातील आव्हाने, ध्येय निश्चितीचे महत्त्व, कौशल्य विकास आणि शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शैक्षणिक विचारांचा उल्लेख करत त्यांनी शिक्षण हेच प्रगतीचे प्रभावी साधन असल्याचे सांगितले. तसेच पालक आणि विद्यार्थ्यांमधील संवाद, समन्वय आणि विश्वासाचे नाते मजबूत असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. योग्य ध्येय, योग्य दिशा आणि कौशल्य यांच्या बळावर विद्यार्थी जीवनात मोठी प्रगती करू शकतात, असा आशावाद मान्यवरांनी व्यक्त केला. यावेळी व्ही. ए. कदम आणि श्रीधर जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष शंकर जाधव यांनी अध्यक्षीय समारोपात विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक, वह्या, पेन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आत्मचरित्र तसेच गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. याशिवाय विशाल चंद्रकांत आयनोडकर यांचा संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सल्लागार आयु. अंकुश विष्णू जाधव यांनी केले. सूत्रसंचालन सहसचिव आयु. भिवा कृष्णा आयनोडकर यांनी तर आभार प्रदर्शन सहखजिनदार आयु. श्रीधर जाधव यांनी केले.यावेळी संस्थेचे पदाधिकारी, सदस्य तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संबोधी बहुउद्देशीय तालुका संस्थेच्या पहिल्याच सामाजिक-शैक्षणिक उपक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि समाजातील सकारात्मक प्रतिसादामुळे संस्थेच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांचे योगदान विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले.






































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)








































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.