रत्नागिरी : दक्षिण आफ्रिकेत कॉम्रेड्स मॅरेथॉन गाजवणारे येथील धावपट्टू अभिजित पड्याळ आणि प्रसाद देवस्थळी यांचे रत्नागिरीकरांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. अभिजित पड्याळ यांनी ९ तास ५१ मिनीटांत स्पर्धा पूर्ण करून रॉबर्ट मिशेल पदक पटकावले. तर प्रसाद देवस्थळी यांनी सलग दुसऱ्या वर्षी स्पर्धेत भाग घेऊन ११ तास २७ मिनीटांत स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल विक क्लॅफॅम पदक व बॅक टू बॅक अशादोन पदकांनी गौरवण्यात आले. अशी स्पर्धा पूर्ण करणारे ते कोकणातील ते पहिले धावपट्टू ठरले आहेत. गुरुवारी सायंकाळी साळवी स्टॉप येथे फटाक्यांची आतषबाजी करत, पुष्पहार, फेटा बांधून अभिजित पड्याळ व धामापूर तर्फे संगमेश्वर गावचे सुपुत्र प्रसाद देवस्थळी यांना सन्मानित केले. याप्रसंगी नागरिक, धावपट्टूंसह, नगरसेवक व विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यानंतर मारुती मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. साळवी स्टॉप ते मारुती मंदिर अशी स्वागत फेरी काढण्यात आली.
या वेळी रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे प्रमुख संदीप तावडे, रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनचे उदय लोध, कौस्तुभ सावंत, सुहास ठाकुरदेसाई, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष महेश सावंत, दर्शन जाधव, ओंकार फडके, पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, स्थानिक नगरसेवक सौरभ मलुष्टे, सुवर्णसूर्य फाउंडेशनचे पदाधिकारी, क्रेडाई, कुटुंबीय तसेच कोकण कोस्टल मॅरेथॉन व गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉनचे कार्यकर्ते, धावपट्टू उपस्थित होते. या दोन्ही धावपट्टूंचे अभिनंदन पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील केले. या वेळी अभिजित पड्याळ यांनी सांगितले की, “९९ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेली जगप्रसिद्ध कॉम्रेड्स मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा आनंद शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. माझी पहिलीच आंतरराष्ट्रीय अल्ट्रा मॅरेथॉन होती. कोकणातून थेट दक्षिण आफ्रिकेपर्यंतचा प्रवास, नवीन देश, नवीन वातावरण आणि जगभरातून आलेल्या हजारो धावपटूंमध्ये उभं राहणं हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. ६० किलोमीटरनंतर क्रॅम्प यायला सुरवात झाली. पहिले तीन क्रॅम्प फिजिओकडून काढताना सुमारे १२ मिनिटांचा वेळ गेला. त्यानंतर वेळ वाचवण्यासाठी पुढचे क्रॅम्प मी स्वतः स्ट्रेचिंग करून कमी केले. क्रॅम्पमुळे पॉली शॉर्ट हिल पूर्ण चालत पार करावी लागली आणि शेवटच्या किलोमीटरपर्यंतही त्यांचा सामना करतच धावावं लागलं. अखेर ९:५१:१२ या वेळेत स्पर्धा पूर्ण केली. तब्बल १८०० मीटर चढ असलेल्या या खडतर अपहिल स्पर्धेने आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव दिला.”
धावपट्टू प्रसाद देवस्थळी म्हणाले की, अभिजीतने वेगवान रत्नागिरीचं दर्शन आफ्रिकेमध्ये दाखवलं, खरंच आता रत्नागिरी कोकणातला फिटनेसचा केंद्रबिंदू होऊ लागला आहे. कोकण कोस्टल मॅरेथॉनची दर रविवारची प्रॅक्टिस रन आता १०० च्या उंबरठ्यावर आहे. अशा प्रकारे सातत्य ठेवले तर कॉम्रेड्स मॅरेथॉनप्रमाणे आपल्याकडे हजारो धावपट्टू नक्की येतील. पुढच्या वर्षी कॉम्रेड्सला रत्नागिरीतून जाणाऱ्यांचा आकडाही वाढेल.











.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)







































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.