खेड (प्रतिनिधी) - रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेड यांच्यावतीने वैश्य भवन खेड या ठिकाणी ’आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला. सदरच्या कार्यक्रमाची सुरुवात खेड नगरपरिषद नगराध्यक्षा माधवीताई बुटाला, रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, लक्ष्मीकांत पटेल, सचिन कर्वा, राजूभाई रेडीज, शंतनू रेडीज, योगा प्रशिक्षक डाॅ. गौरव आंब्रे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती माता व महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. तद्नंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल, श्रीफळ व पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत करण्यात आले. नंतर अहमदाबाद येथे पार पडलेल्या पहिल्या वल्र्ड योगासन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत दोन सुवर्णपदके पटकावणाऱ्या तन्वी रेडीज हिच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल खेड नगरपरिषद नगराध्यक्षा माधवीताई बुटाला यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन भव्य सत्कार करण्यात आला.
यावर्षी निरोगी वृद्धत्वासाठी योग ही संकल्पना यावर्षी निश्चित करण्यात आली होती. खेड तालुक्यातील सर्व शासकीय सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एक उत्तम, सुदृढ आणि निरोगी आयुष्य जगता यावे, या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते. आंतरराष्ट्रीय योगा दिनाची योग्य अंमलबजावणी व्हावी या दृष्टीने रोटरी स्कूलने सुयोग्य नियोजनाखाली वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले होते सर्वप्रथम रोटरी शाळेचे संगीतशिक्षक अभिषेक जोशी उपस्थितांकडून म्युझिक थेरपी करून घेतली. योगाप्रशिक्षक डाॅ. गौरव आंब्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी योग प्रार्थना म्हणून सर्व उपस्थितांना योगसंकल्प देण्यात आला. उपस्थित सर्वांना योगाचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, दत्तमुद्रा, भ्रामरी प्राणायम यांसारख्या आसनांची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांसमवेत शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील योगासनांची प्रात्यक्षिके करून योग दिन साजरा केला.
शिक्षणक्षेत्राबरोबरच योगाक्षेत्रातही आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेत योगशिक्षणाची परंपरा वर्षानुवर्षे जपणाऱ्या रोटरी स्कूलच्या स्पंदन धामणे, श्री दळवी, श्लोक दळवी, शाश्वत धुमाळ या योगापटूंनी त्यांचे योगाविष्कार सादर करत जागतिक योगा दिनाला आगळावेगळा साज चढवला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया चिले यांनी केले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ’आंतरराष्ट्रीय योग’ दिनाच्या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.


















.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)








































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.