पनवेल : पनवेल शहर पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या पनवेल रेल्वेस्टेशन बीट चौकी व परिसराचे सुशोभीकरण करून चौकी नव्याने कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक यांचेसोबत आज संयुक्त पाहणी करण्यात आली. बीट चौकीच्या पाहणीनंतर उपस्थित पनवेल महानगरपालिका व स्थानिक नगरसेवक मिळून चौकीचे व परिसराचे नूतनीकरणाचे काम येत्या काही दिवसात सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान कायदा व सुव्यवस्था तसेच वाहतूक कोंडीच्या दृष्टीने पनवेल रेल्वे स्टेशन परिसराची देखील पाहणी करण्यात आली आहे. पनवेल रेल्वे स्टेशन बीट चौकी व परिसर पाहणीकरिता वपोनि नितीन ठाकरे, गोपनीय विभागाचे अधिकारी शैलेश जाधव, तसेच पनवेल महानगरपालिका विद्यमान नगरसेवक ॲड. मनोज भुजबळ, शिवानी घरत, प्रियंका कांडपिळे, अस्मिता घरत, माजी नगरसेवक सुनील बहिरा, तेजस कांडपिळे, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम हे उपस्थित होते. यावेळी परिसरातील पूर्ण पाहणी करून आवश्यक त्या उपाय योजना करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले.
याबाबत आम्ही पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर यांना या विभागातील सात नगरसेवकांचे पत्र देवून या चौकीचे नुतनीकरण पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून लवकरात लवकर करून घेण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे ॲड. मनोज भुजबळ यांनी सांगितले आहे.


























































































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.