loader
Breaking News
Breaking News
Foto

एमआयडीसीच्या पाणीटंचाईच्या नियोजना अभावी लोटेतील कारखाने बंद

गुणदे (वार्ताहर) एमआयडीसी ने पाणी टंचाई बाबत कोणते हि नियोजन केलेले नसताना थेट कारखानदारांना पाणीटंचाई बाबत पाणीपुरवठा बंद करण्यात येत असल्याचे पत्र दिल्याने उद्योजकांनी लोटे येथील उद्योग भवन येथील पत्रकार परिषदेमध्ये संताप व्यक्त केला गेल्या वर्षीही मे महिन्यामध्ये अशीच थोडया प्रमाणात पाणी टंचाई उद्भवली होती त्यावेळी एमआयडीसी अधिकाऱ्यांनी पुढील वर्षी याबाबत योग्य ते पाणी पुरवठ्याबाबत नियोजन केले जाईल असे आश्वासन दिले होते परंतु याबाबत कोणतीही उपाययोजना अद्याप झाली नाही

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोयना येथील वीज निर्मिती बंद झाल्याने पाण्यावर वीज तयार करून ते पाणी वाशिष्ठी नदीपात्रात सोडले जाते परंतु तेथील वीज निर्मिती बंद झाल्याने नदीपात्रात पाणी सोडले जात नाही याचा फटका एमआयडीसीच्या वालोपे येथील उदंचन केंद्राला पडला आहे वाशिष्ठी नदीपात्रात एमआयडीसीच्या वालोपे येथील उदंचन केंद्राजवळ कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्याचे एमआयडीसी ने प्रस्ताव जलसंपदा खात्याला दिला होता गेली सात ते आठ वर्ष या बंधाऱ्याचे २४ कोटीचे अंदाजपत्रक एमआयडीसी ने मंजूर करून निधी देण्याचे मान्य केले होते मात्र जलसंपदा खात्याकडून याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नाही कारण सदरचा बंधारा बांधण्याबाबत तिथे लोकांचा विरोध दर्शवला गेला होता जर तो बंधारा तिथे बांधला असता तर आज एमआयडीसीच्या वालोपे येथील उदंचन केंद्राला पाणी मिळाले असते व एमआयडीसीचा सुरळीत पाणीपुरवठा सुरू राहिला असता आत्ता त्याच बंधाऱ्याचे २४ कोटी वरून ७४ कोटी वर अंदाजपत्रक तयार झाले मात्र अद्यापही बंधारा काही बांधला गेला नसल्याने एमआयडीसीच्या या आडमुठ्या धोरणाबाबत उद्योजकांनी संताप व्यक्त करून पाण्याअभावी कारखाने बंद पडण्यास व परिसरातील गावांचा पाणीपुरवठा बंद पडण्यास एमआयडीसी जबाबदार आहे असा आरोप केला मुळात येथे कामगार मिळत नाहीत व पूर्वी गॅस टंचाई उद्भवली आता पाणीटंचाई उद्भवल्यामुळे परप्रांतीय कामगार परतीच्या मार्गावर लागले आहेत आम्हाला कारखाने बंद करावे लागले आहेत तेव्हा निदान एमआयडीसी ने परिसरातील गावांना व कारखान्यांना निदान पिण्याचे पाणी तरी टँकर द्वारे पुरवावे जवळच शेलारवाडी धरण आहे तेथील पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला पाणीसाठा एमआयडीसी ने जलसंपदा खात्याकडे मागणी करून टॅंकर द्वारे पुरवावा अशी मागणी होत आहे या पत्रकार परिषदेला लोटे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. राज आंब्रे, राजकुमार जैन सचिव, घरडा चे रामकृष्ण कुलकर्णी, राजेश तिवारी, किसन चव्हाण उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg