संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर शहर आणि परिसरात ऑनलाईन आर्थिक दरोडेखोरांनी उच्छाद मांडला असून, सर्वसामान्यांची कष्टाची कमाई सुरक्षित ठेवण्यासाठी आता अधिक सतर्क होण्याची वेळ आली आहे. गेल्या अवघ्या पंधरा दिवसांतील ऑनलाईन लुटीची ही दुसरी धक्कादायक घटना समोर आली आहे. संगमेश्वर नावडी येथील एका सुशिक्षित इंजिनिअर तरुणाला सायबर भामट्यांनी तब्बल २ लाख २५ हजार रुपयांना चुना लावला आहे. एकापाठोपाठ एक घडणाऱ्या या गंभीर प्रकारांमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये कमालीची चिंता पसरली आहे.संगमेश्वर नावडी येथील ३५ वर्षीय शशांक प्रकाश सावंत या सुशिक्षित तरुणाने या लुटीप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेत रीतसर तक्रार दाखल केली आहे.
संगमेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फसवणुकीची घटना ३० मे २०२६ ते १ जून २०२६ या कालावधीत घडली. अज्ञात सायबर दरोडेखोरांनी फिर्यादी शशांक सावंत यांच्या दोन वेगवेगळ्या बँक खात्यांना लक्ष्य करत यंत्रणेला आव्हान दिले आहे. यामध्ये त्यांच्या 'बँक ऑफ इंडिया' शाखा संगमेश्वर येथील खात्यामधून अनुक्रमे ९५,००० रुपये आणि ८०,००० रुपये, तसेच 'जनता सहकारी बँक लि. पुणे' शाखा संगमेश्वर येथील खात्यामधून ५०,००० रुपये, अशी एकूण २ लाख २५ हजार रुपयांची रक्कम ऑनलाईन पद्धतीने क्षणात लंपास करण्यात आली. संगमेश्वर बाजारपेठ आणि शहरातील वाढती सायबर गुन्हेगारी आता व्यापारी आणि नोकरदारांची झोप उडवत आहे. अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच संगमेश्वर बाजारपेठेतील प्रसिद्ध व्यापारी तौफिक जिकर मेमन व त्यांच्या पत्नीच्या 'बँक ऑफ इंडिया' संगमेश्वर शाखेतील खात्यावर सायबर चोरांनी असाच धाडसी दरोडा टाकला होता. मेमन यांच्या खात्यातून तब्बल २ लाख १४ हजार १४८ रुपये ऑनलाईन चोरून नेण्यात आले होते. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच, आता पुन्हा दुसऱ्या ग्राहकाला अशाच पद्धतीने लुबाडण्यात आले आहे. लागोपाठ घडलेल्या या दोन मोठ्या घटनांमुळे संपूर्ण संगमेश्वर परिसरातील खातेदारांमध्ये सायबर सुरक्षेबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी शशांक सावंत यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठले. त्यानुसार शुक्रवार, दिनांक १२ जून २०२६ रोजी रात्री संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा रजि गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचे वाढते गांभीर्य आणि जनतेमधील अस्वस्थता लक्षात घेऊन संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण हे स्वतः या प्रकरणाचा तपास करत आहेत. सायबर गुन्हेगारांचे हे वाढते धाडस मोडून काढण्यासाठी आणि या हायटेक चोरट्यांचा पर्दाफाश करण्यासाठी तपास यंत्रणांना आता आपली संपूर्ण ताकद पणाला लावावी लागणार आहे. लागोपाठ घडणाऱ्या या ऑनलाईन चोऱ्यांमुळे परिसरातील नागरिकांमधून सायबर चोरांविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. सायबर पोलीस या टोळीच्या मुसक्या कधी आवळणार आणि संगमेश्वरच्या जनतेला या डिजिटल दरोडेखोरांपासून कधी मुक्ती मिळणार? याकडे आता संपूर्ण तालुक्याचे डोळे लागले आहेत.



































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.