loader
Breaking News
Breaking News
Foto

MHT CET पीसीएम परीक्षेत रोटरी स्कूल अव्वल

खेड (प्रतिनिधी) - एमएचटी - सीईटी ( MHT CET ) पी.सी.एम ग्रुप परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडमधील तब्बल 72 विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा अधिक पर्सेनटाईल गुण प्राप्त करून संपूर्ण जिल्ह्यात आपल्या शाळेचे नाव गौरवित केले आहे. इयत्ता 12 वी नंतर मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी व ॲग्रीकल्चर यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सदर एमएचटी - सीईटी ( MHT CET ) परीक्षा ऑनलाईनरित्या घेतली जाते. यावर्षीही MHT CET या प्रवेश परीक्षेत रोटरी स्कूलच्या PCM ग्रुपच्या विद्यार्थ्यांमधील एकूण 72 विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा अधिक पर्सेनटाईल तर 116 विद्यार्थ्यांनी 80 पेक्षा अधिक पर्सेनटाईल गुण मिळविले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

MHT CET PCM परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये पार्थ चव्हाण - 99.82 पर्सेनटाईल, करण कांबळे - 99.30 पर्सेनटाईल, पवन देवकाते - 99.15 पर्सेनटाईल, शर्विन पडवळ - 98.95 पर्सेनटाईल, जुहेद नागुठणे - 98.74 पर्सेनटाईल, सोहम घाडी - 98.73 पर्सेनटाईल, तनुष सुर्वे 98.54 पर्सेनटाईल, निहार जोशी - 98.51 पर्सेनटाईल, सार्थक देवरुखकर - 98.44 पर्सेनटाईल, हर्षद पाटील - 98.26 पर्सेनटाईल, श्रुती चव्हाण - 98.23 पर्सेनटाईल, साईराज हटकर - 98.14 पर्सेनटाईल, किंजल मोकारिया 97.93 पर्सेनटाईल, वेदांत पंडुळे - 97.88 पर्सेनटाईल, यश पडवळ - 97.80 पर्सेनटाईल, सोहम खोपटकर - 97.79 पर्सेनटाईल, राज घडशी - 97.61 पर्सेनटाईल, श्रेयस पवार - 97.56 पर्सेनटाईल, आर्य शिर्के - 97.43 पर्सेनटाईल, आर्यन दबेकर - 97.42 पर्सेनटाईल, इमाद खोत - 97.29 पर्सेनटाईल, आर्या नाईक - 97.16 पर्सेनटाईल, चैतन्य सळये - 97.10 पर्सेनटाईल, पार्थ दोशी - 97.09 पर्सेनटाईल, मानस पालकर - 96.96 पर्सेनटाईल व हुमायरा खतिब - 96.69 पर्सेनटाईल यांनी 97 पेक्षा अधिक पर्सेनटाईल गुण मिळवून यश प्राप्त केले.

टाईम्स स्पेशल

वरील सर्व विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत रोटरी स्कूलची यशोगाथा कायम राखली आहे. एमएचटी सीईटी- पी.सी.एम. परीक्षेमध्ये संपूर्ण कोकणात भरघोस यश मिळवणारी रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल ही एकमेव ठरलेली आहे. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमेस्ट्री, मॅथ्स् या विषयांचे शिक्षक, वर्गशिक्षक, परीक्षा विभागातील शिक्षक यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी MHT CET PCM परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg