रत्नागिरी, (जमीर खलफे) - विद्यार्थ्यांच्या पाठीवर केवळ कौतुकाची थाप न देता, त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासात खारीचा वाटा उचलण्याच्या उद्देशाने मराठी पत्रकार परिषद, रत्नागिरीच्यावतीने एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. रत्नागिरी येथील दामले विद्यालयात गुरुवारी होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला मराठी पत्रकार परिषदेचे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकारिता केवळ बातम्या लिहिण्यापुरती मर्यादित न ठेवता, समाजातील घटकांशी नाळ जोडणारा हा उपक्रम परिषदेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात पार पडला. याप्रसंगी बोलताना पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष हेमंत वणजू यांनी सांगितले की, विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. पैशांअभावी किंवा साहित्याअभावी कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, हीच आमची भावना आहे. सामाजिक बांधिलकी जपत पत्रकार परिषदेने हा छोटासा प्रयत्न केला आहे. यावेळी दामले विद्यालयातील शिक्षकवृंदाने मराठी पत्रकार परिषदेच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. पत्रकार हे समाजाचा आरसा असतातच, पण आज त्यांनी दाखवलेली ही सामाजिक संवेदनशीलता आम्हा शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे, अशा भावना शाळेच्या मुख्याध्यापक मोटे सर व शिक्षकांनी व्यक्त केल्या.












































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.