loader
Breaking News
Breaking News
Foto

कणघर बायोडायव्हर्सिटी झोन, म्हसळा-श्रीवर्धनच्या विकासाला गती मिळणार!

म्हसळा (वार्ताहर) - महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली म्हसळा - श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटनाच्या दृष्टीने सुरू असलेल्या विकास प्रकल्पांचा आढावा मंत्रालय, मुंबई येथे बैठकीच्या माध्यमातून घेण्यात आला. म्हसळा तालुक्यातील कणघर येथे बायोडायव्हर्सिटी झोन विकसित करण्यात यावा, यासाठी सुमारे २० एकर जागा निश्चित करावी असे निर्देश मंत्री अदिती तटकरे बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कणघर येथील जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी येथे बायोडायव्हर्सिटी झोन विकसित करण्यात यावा. या परिसरातील, हिरवा शाही कवडा (ग्रीन इंपिरियल पिजन), निलगिरी रानपारवा (निलगिरी वूड पिजन), मलबारी राखी धनेश (मलबार ग्रे हॉर्नबिल), महाधनेश (ग्रेट हॉर्नबिल), मलबारी कवड्या धनेश, (मलबार पाईड हॉर्नबिल) पांढऱ्या गालाचा तांबट किंवा कर्टूक (व्हाईट चीक बार्बेट), सह्याद्री शिंजीर (व्हिगॉरस सनबर्ड), अशा विविध पक्ष्यांच्या प्रजातींचे सौंदर्य अनुभवण्याची संधी महाराष्ट्रातील, भारतातील, जगभरातील नागरिकांना अनुभवता यावी यासाठी पक्षी निरीक्षण केंद्र उभारणे तसेच या परिसरात वॉक-वे, पाथ-वे विकसित करण्यासाठी प्राथमिक प्रस्ताव सादर करावा अशाही सूचना देखील म मंत्री महोदयांनी दिल्या आहेत.

टाईम्स स्पेशल

या बैठकीस म्हसळा पंचायत समिती सभापती बबन मनवे, जिल्हा परिषद सदस्य अभिषेक विचारे, वन संरक्षक, रोहा, अवर सचिव, पर्यटन, उपविभागीय अधिकारी, श्रीवर्धन, तहसीलदार, म्हसळा, वन परिक्षेत्र अधिकारी, म्हसळा, वन परिक्षेत्र अधिकारी, श्रीवर्धन संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg