loader
Breaking News
Breaking News
Foto

नवनिर्माण महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

संगमेश्वर (प्रतिनिधी) - नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला नवनिर्माण नर्सिंग महाविद्यालयाचे प्रतिनिधी, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संजना चव्हाण तसेच डॉ. संतोष खरे , किरण गुरव आदी उपस्थित होते. योग दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी देवरुख येथील योग प्रशिक्षक अशोक गणपत कुमटेकर यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व पटवून देत सुमारे ३५ विविध योगासनांचे प्रात्यक्षिक सादर केले. विद्यार्थ्यांनीही त्यांच्या मार्गदर्शनाखाली योगासनांचा सराव केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

योगामुळे शरीरातील विविध वेदना, ताणतणाव आणि आजारांपासून बचाव होण्यास मदत होते. निरोगी व तंदुरुस्त शरीर हे नियमित योगाभ्यासाचे फळ असल्याचे सांगत प्रत्येकाने केवळ योग दिनापुरता नव्हे, तर दैनंदिन जीवनातही योगाचा अंगीकार करावा, असे आवाहन योग प्रशिक्षक अशोक कुमटेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. संतोष खरे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देत प्रास्ताविक केले व योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्या डॉ. संजना चव्हाण यांनी ६४ व्या वर्षीही अशोक कुमटेकर यांनी उत्कृष्ट योगप्रात्यक्षिके सादर केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले. नियमित योगाभ्यासामुळेच त्यांना निरोगी व सुदृढ आरोग्य लाभले असून विद्यार्थ्यांनीही योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागप्रमुख प्रा. प्रशांत जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. पूजा प्रसादे यांनी केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg