देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील चाफवली शाळा नंबर 1 मध्ये जून च्या 15 तारखेला नवागतांच्या स्वागताला जिल्हा परिषद उपाध्यक्ष व आरोग्य सभापती विलास चाळके यांच्यासह संगमेश्वर तालुका गटशिक्षणाधिकारी विजयकुमार परीट विस्तार अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव हे उपस्थित राहिल्याने नवागतांच्या स्वागताला वेगळीच रंगत आली. चाफवली शाळा नंबर 1 मध्ये सर्वप्रथम नवागतांचे स्वागत करण्यात आले. तसेच प्रभात फेरी काढण्यात आली. शैक्षणिक गुढी उभारण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शारदा माता व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आले.
या कार्यक्रमात जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके यांनी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांची घटती पटसंख्या पाहता पुढील काही वर्षात मराठी शाळा बंद होतील की काय अशी खंत व्यक्त केली. आज रत्नागिरीच्या दामले शाळेत प्रवेशासाठी रांग लागलेली असते परंतु ग्रामीण भागातील शाळात मुलं शोधावी लागतात याचं कारण ग्रामीण भागातील पालक शहरी भागाकडे वळल्याने हा परिणाम झाल्याची खंत विलास चाळके यांनी व्यक्त केली. संगमेश्वर तालुका गटशिक्षणाधिकारी विजयकुमार परीट यांनीही आपल्या मनोगत मराठी शाळांचा पट कमी होत चाललेल्या बाबत खंत व्यक्त केली विस्तार अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वितरण गणवेश वितरण करण्यात आले. तसेच वृक्षारोपण करून मुलांना मूळ खाऊ वाटण्यात आला. या शाळेतील शिक्षकांनी गेली अनेक वर्षे स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती, नवोदय विद्यालय, अशा ठिकाणी आपले विद्यार्थी आणले आहेत. तसेच नासा इस्रो साठी गेली तीन वर्ष या शाळेचे विद्यार्थ्यांची निवड होत असल्याने येथील शिक्षक वर्गाचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला चाफवलीतील ग्रामस्थ महिलावर्ग उपस्थित होते.





















































































































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)
































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.