loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्ह्यातील शाळांमध्ये चिमुकल्यांचा किलबिलाट पुन्हा सुरू

म्हसळा - उन्हाळी सुट्टी संपताच आज दि.१५ जूनपासून जिल्ह्यातील शाळांमध्ये घंटेचा गजर घुमायला लागला असून शाळांमध्ये चिमुकल्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी पी.एम.श्री. शाळेत मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर प्रवेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालक शिक्षण प्रवाहात यावा यासाठी म्हसळा पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले, त्यामध्ये प्रामुख्याने प्रभात फेरी, विद्यार्थी पदयात्रा, पालकांच्या गृहभेटी, शाळा व परिसर स्वच्छता, रांगोळी आणि फुलांची सजावट इत्यादी उपक्रमांचा समावेश करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यामध्ये प्रामुख्याने प्रभात फेरी, विद्यार्थी पदयात्रा, पालकांच्या गृहभेटी, शाळा व परिसर स्वच्छता, रांगोळी आणि फुलांची सजावट इत्यादी उपक्रमांचा समावेश करण्यात आला. म्हसळा नगराध्यक्ष सुनिल शेडगे, उपनगराध्यक्षा कमल जाधव, पं. स. सदस्या समृद्धी चाचले, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शशिकांत शिर्के, शा.व्य.समिती माजी अध्यक्ष सुशिल यादव, सदस्य अंकुश नटे, निता दर्गे, मुख्याध्यापिका सुमित्रा खेडेकर, शिक्षक नरेश मुंडे, जयश्री गायकवाड, इंदिरा चौधरी, श्रीधर उमदी आदि मान्यवर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

सुरुवातीस सुमित्रा खेडेकर यांनी प्रास्ताविक केले. नगराध्यक्ष सुनिल शेडगे, सुशिल यादव यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून मार्गदर्शन केले. प्रवेशोत्सव उपक्रमाचे औचित्य साधून इ.१ ली ते ४ च्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि मोफत गणवेशाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg