रत्नागिरी - भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेवर विश्वास ठेवून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले अभिषेक सुर्वे यांनी आपल्या मित्रपरिवारासह भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पक्षाच्या वतीने अभिषेक सुर्वे यांच्यावर शक्ती केंद्रप्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आणि बूथ स्तरापर्यंत भाजपची ताकद वाढविण्यासाठी ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टी ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देणारी आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देणारी संघटना आहे अभिषेक सुर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पक्षप्रवेश हा रत्नागिरी शहरातील भाजपच्या वाढत्या जनाधाराचा पुरावा आहे नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांमुळे संघटनात्मक बळकटी मिळणार असून आगामी काळात प्रत्येक शक्ती केंद्र आणि बूथ स्तरावर भाजप अधिक सक्षमपणे कार्य करेल. आमदार प्रमोद जठार यांनीही नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आणि महायुती सरकारच्या विकासकामांमुळे सर्वसामान्य नागरिकांचा भाजपवरील विश्वास अधिक दृढ होत आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील तरुण आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये सहभागी होत आहेत.
अभिषेक सुर्वे यांनी पक्षप्रवेशानंतर बोलताना भारतीय जनता पार्टीची विचारधारा राष्ट्रहिताची भूमिका आणि विकासाभिमुख कार्यपद्धती यामुळे आपण पक्षात प्रवेश केल्याचे सांगितले. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून संघटना वाढीसाठी कार्य करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. या प्रवेशामुळे रत्नागिरी शहरातील भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक विस्ताराला नवी ऊर्जा मिळाली असून आगामी स्थानिक आणि संघटनात्मक उपक्रमांमध्ये नव्या कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग राहणार असल्याचे पक्ष पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि अभिषेक सुर्वे यांचे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























































































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.