loader
Breaking News
Breaking News
Foto

पावसासाठी खेडमध्ये मुस्लिम बांधवांची विशेष नमाज; भर उन्हात ईश्वराकडे मेघवृष्टीची प्रार्थना

खेड (प्रतिनिधी) : कोकणासह रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने अद्याप अपेक्षित हजेरी लावलेली नसल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीची कामे खोळंबली असून पाण्याच्या उपलब्धतेबाबतही नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर खेड शहरातील मुस्लिम बांधवांनी पावसासाठी विशेष नमाज अदा करून ईश्वराकडे मेघवृष्टीची प्रार्थना केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खेड येथील हाजी एस. एम. मुकादम हायस्कूलच्या मैदानावर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्र आले होते. इस्लाम धर्मातील परंपरेनुसार पावसासाठी अदा केली जाणारी विशेष ‘सलातुल इस्तिस्का’ (बारिशची नमाज) भर उन्हामध्ये खुल्या मैदानात अदा करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी अल्लाहकडे पाऊस पडावा, शेतकऱ्यांचे संकट दूर व्हावे तसेच सर्वत्र सुख-समृद्धी नांदावी यासाठी सामूहिक प्रार्थना केली.

टाईम्स स्पेशल

सध्या जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून खरीप हंगामाची कामे रखडली आहेत. या परिस्थितीत पावसासाठी विविध धार्मिक स्थळांवर प्रार्थना आणि पूजाविधी सुरू असताना खेडमधील मुस्लिम समाजानेही एकत्रित येऊन ईश्वराकडे साकडे घातले. भर उन्हात मैदानावर नमाज अदा करत पावसासाठी करण्यात आलेल्या या प्रार्थनेने धार्मिक एकात्मता आणि समाजातील निसर्गाविषयीची आस्था अधोरेखित केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg