loader
Breaking News
Breaking News
Foto

भरणे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर; विशेष ग्रामसभेत प्रक्रिया पार

खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील भरणे ग्रामपंचायतीच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय सदस्य पदांचे आरक्षण शुक्रवार, दि. १२ जून रोजी निश्चित करण्यात आले. भरणे ग्रामपंचायत कार्यालयातील काळकाई सभागृहात आयोजित विशेष ग्रामसभेत ही आरक्षण प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेसाठी अध्यासी अधिकारी म्हणून भरणे मंडळ अधिकारी उमाकांत देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या उपस्थितीत आणि ग्रामस्थांच्या साक्षीने प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत काढण्यात आली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून आगामी राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणानुसार प्रभाग क्रमांक एकमध्ये एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री), एक जागा सर्वसाधारण स्त्री आणि एक जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक दोनमध्ये अनुसूचित जाती (स्त्री), सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण अशी आरक्षण रचना निश्चित करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक तीनमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री), सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. तसेच प्रभाग क्रमांक चारमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण अशा जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक पाचमध्येही नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण अशा स्वरूपाचे आरक्षण जाहीर करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

या विशेष ग्रामसभेस गावातील प्रमुख नागरिक, विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरक्षण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि नियमानुसार पार पडल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यासी अधिकारी उमाकांत देशमुख यांनी ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले आणि विशेष ग्रामसभेची सांगता केली. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने या आरक्षण प्रक्रियेला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले असून आता संभाव्य उमेदवारांच्या हालचालींना वेग येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg