लांजा/केळंबे (प्रतिनिधी) - लांजा शहरातील श्रीराम मंदिर येथील शेकडो वर्षांचा पिंपळ वृक्ष मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास उन्मळून पडला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी अथवा आर्थिक नुकसान झालेले नाही. लांबलेल्याला पावसाने जून महिन्याच्या अखेरीस का होईना आपली हजेरी लावली आहे. सोमवार २२ जूनपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पावसाच्या संतप्तधारेमुळे ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहेत.
मंगळवारी सकाळी लांजा - साटवली मार्गावरील कोंडये बावळेवाडी नजीक वृक्ष कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास लांजा शहरातील श्रीराम मंदीर येथील शेकडो वर्षांपूर्वीचा पिंपळ वृक्ष उन्मळून पडला. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा आर्थिक नुकसान झालेले नाही.
माणसाला भरभरून नैसर्गिक ऑक्सिजन देणारा शेकडो वर्षांपूर्वीचा हा पिंपळ वृक्ष उन्मळून पडल्याने अनेक वृक्षप्रेमींनी दुःख व्यक्त केले. दरम्यान, लांजा शहरात जे काही मोजके जुनाट वृक्ष आहेत त्यापैकी हा एक पिंपळ वृक्ष होता. लांजा शहरातील गेल्या अनेक पिढ्या या पिंपळ वृक्षाने पाहिलेल्या असल्याने शहरातील नागरिकांनी देखील हा पिंपळ वृक्ष उन्मळून पडल्याने दुःख व्यक्त केले आहे.












































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.