loader
Breaking News
Breaking News
Foto

न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे येथे ‘एआय तंत्रज्ञान वर्ग खोली’चे उद्घाटन

रत्नागिरी: (जमीर खलफे) - ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाचे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने, न्यू ईरा एज्युकेशन सोसायटी संचलित ‘न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे’ येथे १९ जून रोजी ’एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञान वर्ग खोली’चे उद्घाटन अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाले. या नूतन तंत्रज्ञान कक्षाच्या माध्यमातून शाळेने शैक्षणिक क्षेत्रात एक मोठे आणि आधुनिक पाऊल टाकले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष अकबर डिंगणकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच संस्थेचे सचिव सादिक कापडे, अजीज माद्रे , लांबे, हसमत निवेकर, सौ. फरमीन निवेकर, सौ. नगमा खान यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक इमरान अंतुले सर, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg