केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - गरिबीतून वर येऊन स्वतःच्या मेहनतीने 'पोटाचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती या नेहमीच प्रेरणादायी असतात. अशाच प्रकारे लांजा शहरामध्ये प्रकाश विठोबा जाधव यांनी ओमनी गाडीमध्ये तबला मेकर्सचा व्यवसाय थाटून आपल्या कुटुंबासाठी उदर निर्वाहाकरीता हम रस्त्यावर व्यवसाय करीत आहेत. कठोर परिश्रमाच्या जोरावर आज स्वताच पायावर उभे असुन इतरांनी प्रेरणा घेण्यासारखे आहे. प्रकाश विठोबा जाधव यांचे लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली गाव आहे. गरीब परिस्थितीमुळे प्राथमिक शाळेतील शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबईला नोकरी निमित्ताने गेले. तबला मेकर्स दुकानात कामाला राहीले आणि याच अनुभवातून स्वत:चा व्यवसाय करण्याचा मनी निश्चय करून गावाला आले.
अत्यंत मर्यादित भांडवल व्यवसायातील अनुभवाच्या जोरावर लांजा शहरात जुना फणस स्टाॅप येथे तबला मेकर्स चे छोटेसे दुकान सुरू केले. गेली चाळीस वर्ष ते तबला मेकर्स चा व्यवसाय करीत आहेत. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामध्ये त्यांचे भाड्याचे असलेले दुकान गेले. विस्तापीत झालेल्या प्रकाश विठोबा जाधव यांना आर्थिक परिस्थितीमुळे इतरत्र दुकान खरेदी करणे शक्य नव्हते. व्यवसायाची जागा गेल्यामुळे करायचं काय असा प्रश्न जाधव यांना पडला. मात्र खचून न जाता प्रकाश जाधव यांनी शक्कल लढवून त्यानी जुनी ओमनी गाडी घेऊन त्या गाडीमध्ये ढोलकी, तबला, ढोलक, ताशा रीपेअरींग करण्याचा व्यवसाय थाटून व्यवसायाला सुरूवात केली आहे. मुबंई गोवा महामार्गावरील रस्त्यावर लांजा शहरात गाडी उभी करून व्यवसाय करीत आहेत. रस्त्याच्या कामामुळे त्रास ही सोसावा लागत आहे. तरीही जाधव पोटाची खळगी भरण्याठी तग धरून आहेत.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अत्यंत मर्यादित भांडवलातून, व्यावसायिक अनुभव आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर व्यवसाय सुरू करून आज ते आपल्या कुटुंबाचा संभाळ करीत आहेत. कोणतीही अंगात कला असली तरी काम करताना लाज न बाळगता मेहनत करण्याची हिंमत आणि व्यवसायातील चीकाटी असेल तर माणूस कुठेही पोट भरू शकतो, हे प्रकाश जाधव यांनी दाखवुन दीले असून जाधव यांची प्रेरणादायी यशोगाथा आहे.


















































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)







































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.