loader
Breaking News
Breaking News
Foto

'प्रधानमंत्री ग्रामसडक' योजनेतून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ३ पुलांच्या कामांना मंजुरी; एकूण ८ कोटी ७४ लाखांचा निधी

सावंतवाडी (प्रतिनिधी) केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भाग ३ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील दोडामार्ग व सावंतवाडी तालुक्यांतील तीन ग्रामीण रस्त्यांवरील पुलांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. या कामांसाठी एकूण ८ कोटी ७४ लाखांपेक्षा अधिक निधी मंजूर करण्यात आला असून, यामुळे पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या व रहदारीच्या समस्या कायमस्वरूपी दूर होण्यास मदत होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​मंजूर झालेली पुलांची कामे पडवे कोलझर कुंभवडे पणतुर्ली रस्ता २२ मीटर लांबीच्या पुलासाठी २ कोटी ७८.०५ लाख रुपये. भेडशी खानयाळे शिरंगे पुनर्वसन रस्ता ४० मीटर लांबीच्या पुलासाठी ३ कोटी ४७.५८ लाख रुपये. बांदा मच्छीमार्केट बांदेश्वर मंदिर ते सटमट डिंगणे रस्ता (सावंतवाडी तालुका) २४.०५ मीटर लांबीच्या पुलासाठी २ कोटी ४९.७७ लाख रुपये, अशी कामे मंजूर झाली आहेत.

टाईम्स स्पेशल

​सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या मागणीनुसार आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या विशेष प्रयत्नातून ही कामे मंजूर करण्यात आली आहेत. ग्रामीण भागातील जनतेसाठी अत्यंत आवश्यक असणारे हे पूल मंजूर केल्याबद्दल आमदार दीपक केसरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg