रत्नागिरीतील सुप्रसिद्ध श्रीराम मंदिरात महापुरुषोत्तम मास पूर्तीनिमित्त श्रीमद् भागवत् (संक्षिप्त) पाठ वाचनाचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला. हा कार्यक्रम सादर करणार्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी), नाचणे या संस्थेच्या भगिनी व भाविकांचे सर्वांनी कौतुक केले. रत्नागिरीतील श्रीराम मंदिरात सोम. दि. १५ जून रोजी श्री महापुरुषोत्तम मास पूर्तीनिमित्त श्रीमद् भागवत पाठ वाचनाचा कार्यक्रम श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी), नाचणे या मंडळाच्या भगिनी व भाविकांनी जोषपूर्ण वातावरणात सादर केला. हा कार्यक्रम सादर करण्यासाठी श्रीराम मंदिर देवस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त श्री. बाबासाहेब चौगुले यांच्या धर्मपत्नी सौ. मंदा बाबासाहेब चौगुले व श्री. संतोष यादव यांनी अथक परीश्रम घेतले.
यावेळी श्रीराम मंदिर संस्थेचे विश्वस्त सर्वश्री नित्यानंद दळवी, दिपक राऊत व अध्यक्षा सौ. उर्मिलाताई घोसाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थित भगिनींची ओटी देवस्थानतर्फे भरण्यात येऊन आदरसत्कार करण्यात आला. श्रीराम मंदिरात नित्यनेमाने येणार्या सर्वच भाविकांनी जोषपूर्णपणे भागवत पाठ वाचन करणार्या भगिनी व भाविकांचे यावेळी कौतुक केले. सर्व उपस्थितांना देवस्थानतर्फे पायनापल शिरा व केळे असा अल्पोपहार देण्यात आला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे विश्वस्त श्री. नित्यानंद दळवी यांनी विशेष परीश्रम घेतले.


























































































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.