loader
Breaking News
Breaking News
Foto

पोदार इंटरनॅशनल स्कूल रत्नागिरी येथे इन्व्हेस्टिचर सेरेमनी दिमाखात संपन्न

रत्नागिरी - पोदार इंटरनॅशनल स्कूल, रत्नागिरी येथे विद्यार्थी परिषदेच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा व शपथविधीचा भव्य इन्व्हेस्टिचर सेरेमनी कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या समारंभात विद्यार्थी नेतृत्व व जबाबदारी आणि सेवाभावाच्या नव्या पर्वा ची सुरुवात झाली. विद्यार्थी प्रतिनिधींची निवड कठोर आणि पारदर्शकर्शक प्रक्रियेद्वारे करण्यात आली. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना प्रमख पाहुणे पी.एस.आय. अभय तेली तसेच शाळेच्या प्राचार्या प्राजक्ती गायकवाड यांच्या हस्ते बॅज प्रदान करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हे बॅज विद्यार्थ्यांवर सोपविण्यात आलेल्या विश्वासाचे आणि नेतृत्ववाच्या जबाबदारीचे प्रतीक ठरले. यावेळी स्कूल हेड बॉय आणि स्कूल हेड गर्ल यांनी आगामी शक्षैणिक वर्षासाठीची आपली उद्दिष्टे व दृष्टीकोन मांडत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. प्राचार्या प्राजक्ती गायकवाड यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात नेतृत्व, चारित्र्य विकास आणि उत्कृष्टतेचे महत्त्व अधोरेखित केले. प्रमख पाहुणे पी.एस.आय. अभय तेली यांनी विद्यार्थ्यांना नेतृत्व व चिकाटी आणि आव्हानांना सामोरे जाण्याच्या क्षमते विषयी मौल्यवान मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये नवचतैन्य निर्माण केले. समारोपप्रसगी उपस्थितांचे आभार मानण्यात आले. हा समारंभ पोदार इंटरनॅशनल स्कूल, रत्नागिरीच्या उत्कृष्ट शैक्षणिक व नेतृत्व व परंपरेचे प्रतीक ठरत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी ठरला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg