वेळणेश्वर - जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन विभागातर्फे प्रतीवर्षी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धा आयोजित करण्यात येते. जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, लांजा, राजापूर आणि रत्नागिरी असे एकूण ९ तालुके असून या सर्व तालुक्यांत मिळूण एकूण ८४७ ग्रामपंचायती आहेत. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धा या वर्षीसुद्धा सन २०२५-२६ अंतर्गत जिल्हा परिषद रत्नागिरी गटामधील एकूण ८४७ ग्रामपंचायतीमधून प्रथम क्रमांकाच्या सर्वात जास्त गुण प्राप्त करणाऱ्या फक्त पहिल्या १ ते ९ क्रमांकाच्या ग्रामपंचायतींंची तपासणी, जिल्हास्तरीय तपासणी समितीकडून करून जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या ग्रामपंचायतीची गुणांकनानुसार निश्चित करण्यात आले. त्यानुसार गुहागरची खामशेत ग्रामपंचायत प्रथम क्रमांक (१९८ गुण), राजापूरची खरवते ग्रामपंचायत द्वितीय क्रमांक (१९३ गुण) तर रत्नागिरीची पानवल ग्रामपंचायत तृतीय क्रमांक (१७९ गुण) यांची जिल्हास्तरीय पारितोषिका करीता गुणानुक्रमे निवड करण्यात आली आहे.
तसेच विशेष पुरस्कारासाठी सुद्धा जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत असलेल्या एकूण ८४७ ग्रामपंचायतीं मधून तीन ग्रामपंचायतीची गुणानुक्रमे निवड करण्यात आली आहे. यामध्ये स्व. वसंतराव नाईक पुरस्कार (घनकचरा, सांडपाणी व मैलागाळ व्यवस्थापन) यासाठी गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत उमराठची (एकूण ५६ गुणांपैकी ४८ गुण) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन) यासाठी सुद्धा ग्रामपंचायत उमराठची (एकूण ३० गुणांपैकी २६ गुण) निवड करण्यात आली आहे. असे एकाच वेळी दोन विशेष पुरस्कार ग्रामपंचायत उमराठने पटकावले आहेत. तसेच स्व. आबासाहेब खेडकर पुरस्कार (सौचालय व्यवस्थापन) यासाठी संगमेश्वरच्या ग्रामपंचायत माखजनची (एकूण ६७ गुणांपैकी ६२) निवड करण्यात आली आहे.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात उत्कृष्ट कामगिरी करून ग्रामपंचायत खामशेत व उमराठ यांनी तालुक्याचा मान उंचावला आहे. या यशामागील सर्व लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा पंचायत समिती गुहागर यांनी दिल्या आहेत.



















































.jpg)



























































































































































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.