loader
Breaking News
Breaking News
Foto

12 ते 15 जूनदरम्यान कोसळणार मोठा पाऊस

मुंबई : वेळेआधीच मान्सून दाखल झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र मे महिन्याच्या मध्यापासून कोसळणारा हा पाऊस अचानक गायब झाला असून मान्सून पुन्हा खर्‍या अर्थाने सुरू होण्यास अजून 4 - 5 दिवस लागण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 12 ते 15 जूनदरम्यान मान्सून परतेल आणि धुंवाधार बरसेल असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

समुद्रामधील हवामानाचा दाब व मान्सून प्रवासाची गती लक्षात घेता जवळपास आठवडाभरात म्हणजे 12 जूनपर्यंत मुंबई व 15 जूनपर्यंत विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचे जोरदार आगमन होण्याचे संकेत ग्रीकल्चर मेट्रॉलॉजी फोरमचे (साऊथ एशिया) सदस्य डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिले आहेत.

टाइम्स स्पेशल

यावर्षी विदर्भासह महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन, प्रवास व मोसमातील पाऊसमान या विषयावर बोलताना डॉ. साबळे यांनी चांगल्या पाऊसमानाचा अंदाज व्यक्त केला आहे. साधारणतः 10 जून नंतर महाराष्ट्रावर हवेचा दाब कमी होत असून, त्याचवेळी हिंदी महासागरातील तापमान 31 अंश सेल्सिअस, अरबी समुद्राचे तापमान 30 अंश सेल्सिअसच्यावर राहण्याचा अंदाज असून, ही स्थिती बाष्पीभवन वाढायला आणि ढग निर्मितीला उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर प्रशांत महासागराचे तापमान 26 अंश सेल्सिअस व पेरु जवळ 13 अंश सेल्सिअस असून, या बाजूने हवेचा दाब वाढला की, वारे भारताच्या दिशेने येतात. त्यामुळे खंडाचा कालावधी सुद्धा कमी राहू शकतो. 12 ते 15 जून दरम्यान मान्सूनचा जोर विदर्भात सर्वत्र दिसून येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg