loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना (उबाठा) महिला तालुका संघटकपदी जेनिफर लोबो यांची निवड

तिलारी (प्रतिनिधी) : '८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण' हे शिवसेनेचे ब्रीदवाक्य अंगी बाणवून गेल्या १२ वर्षांपासून अविरत समाजकार्य करणाऱ्या सौ. जेनिफर मार्शेल लोबो यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दोडामार्ग महिला तालुका संघटक पदी निवड करण्यात आली आहे. एका सामान्य कुटुंबातून येत, बांधकाम कामगारांच्या प्रश्नांसाठी झटणाऱ्या एका अभ्यासू नेतृत्वला ही संधी मिळाल्याने तालुक्यातून कौतुक होत आहे. सौ. जेनिफर लोबो यांनी गेल्या पाच वर्षांत साटेली भेडशी ग्रामपंचायत सदस्य म्हणून प्रभावी काम केले आहे. विशेषतः दोडामार्ग तालुक्यातील असंघटित बांधकाम कामगारांची नोंदणी वाढवून, त्यांना शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी त्या नेहमीच अग्रेसर राहिल्या आहेत. त्यांच्या या तळागाळातील कामाची आणि संघटन कौशल्याची वरिष्ठांनी योग्य दखल घेऊन त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ही निवड जाहीर झाल्यानंतर, शिवसेना महिला जिल्हा संघटक सौ. श्रेया परब यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, तालुकाप्रमुख संजय गवस, महिला तालुका प्रमुख श्रीम. विनीता घाडी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना सौ. जेनिफर लोबो म्हणाल्या, "पक्षप्रमुख आणि वरिष्ठ नेत्यांनी एका सामान्य घरातील महिलेवर जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. या पदाला पूर्णपणे न्याय देऊन सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन. तसेच, पक्ष संघटना वाढवण्यासाठी सदैव तत्पर राहून काम करेन." सौ. लोबो यांच्या निवडीमुळे दोडामार्ग तालुक्यात महिला आघाडी आणि कामगार वर्गाचे प्रश्न अधिक प्रकर्षाने मांडले जातील, असा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg