नाशिक: नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात तयारीला सुरुवात झाली आहे. राज्य सरकार आणि नाशिक महानगरपालिका कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या लाखो भक्त, साधू-संतांच्या निवासासाठी तपोवन परिसरात ‘साधूग्राम’ उभारण्याचा प्रकल्प राबवत आहेत. या प्रकल्पासाठी तपोवन परिसरातील सुमारे 1800 प्रौढ व दुर्मिळ झाडे तोडावी लागणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
अभिनेता व सामाजिक कार्यकर्ते सयाजी शिंदे यांनी स्वतः तपोवन परिसराला भेट देऊन वृक्षतोडीची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे, “आम्ही तुम्हाला इथलं एकही झाड तोडू देणार नाही.” शिंदे म्हणाले, “मला इथल्या काही लोकांनी सांगितलं की, सरकार इथे प्रदर्शन केंद्र उभारणार आहे. याबद्दल मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर द्यायला हवं. ते जबाबदार व्यक्ती आहेत. त्यांच्याशी माझा काही वैर नाही, आणि असलं तरी मला फरक पडत नाही. कारण इथे प्रश्न झाडांचा आहे.” सरकारच्या दुहेरी भूमिकेवर टीका करत म्हणाले, “एका बाजूला तुम्ही इथली झाडं तोडता आणि दुसऱ्या बाजूला नवी झाडं लावतो म्हणता, अशी वक्तव्ये करू नका.”
तपोवनातील झाडतोडीच्या प्रस्तावाला नाशिककर, पर्यावरणप्रेमी, नागरिक संघटना यांनी जोरदार विरोध केला आहे. तपोवन मधील झाडांचे पर्यावरणीय व अध्यात्मिक स्थान आहे. तसेच नाशिकची हरित पट्टी धोक्यात येईल, याची चिंता स्थानिकांनी व्यक्त केली आहे. नाशिकमधील कुंभमेळा व्यवस्थापनाच्या दृष्टीने साधूग्राम उभारणी महत्त्वाची मानली जात आहे. तरी 1800 झाडांची तोड हा अतिशय गंभीर पर्यावरणीय प्रश्न असल्याने या मुद्द्यावर मोठा संघर्ष उभा राहण्याची चिन्हे दिसत आहेत. सरकारकडून यासंबंधी अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आली नाही.तरी सयाजी शिंदेंच्या इशाऱ्यानंतर हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.






































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.