loader
Breaking News
Breaking News
Foto

तरुण मुलं राजकारणात येत असतील तर त्यांना पुढे जायला दिलं पाहिजे - विशाल परब

सावंतवाडी : तरुण मुलं राजकारणात येत असतील तर त्यांना पुढे जायला दिलं पाहिजे. तुमच वय झाल असून आता आराम करावा असा मुलाप्रमाणे सल्ला देतो असं विधान भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी केलं. सावंतवाडी येथे प्रचारा दरम्यान ते बोलत होते. परब म्हणाले, भाजपच्या नगराध्यक्षांसह नगरसेवक विजयी झालेत‌. शहरात भाजपची ताकद वाढली आहे. तीन डिसेंबरला निकाल तुम्हाला दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भविष्यात आमदार, खासदार व ग्रामपंचायत भाजपची असेल. सावंतवाडीत विकास करण्यासह हॉस्पिटल आणण्यासाठी आमचा भर आहे‌.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

२० वर्ष एकच आमदार आहेत. २५ वर्ष नगरपरिषद त्यांच्या ताब्यात होती. काही गोष्टी चांगल्या असल्या तरी म्हणावा तसा विकास झालेला नाही अशीही टीका त्यांनी केली. माझ्यासारखा तरुण काहीतरी करु शकतो. पालकमंत्री नितेश राणे सावंतवाडीत येऊन गेलेत. त्यामुळे मागच्या वेळी झालेली चुक दुरुस्त होईल, तरूण आणि महिला वचपा काढतील असाही टोला त्यांनी लगावला. यावेळी वेदीका परब, महीला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर आदी उपस्थित होते. प्रभाग क्रमांक ७ मध्ये त्यांनी प्रचार केला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg